विक्रांत देशमुख यांना नॅशनल ऍवॉर्ड प्रदान

कामेरी – ब्लड ग्रुप असोसिएशन तासगाव, यांच्यावतीने रक्तदान व रुग्णांना रक्तदानाची मदत या सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा नॅशनल ऍवॉर्ड 2018 हा मानाचा पुरस्कार रक्तदूत म्हणून सुप्रसिद्ध असलेले युवा मोरया सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विक्रांत देशमुख यांना प्रदान करण्यात आला. या प्रसंगी बॉम्बे ब्लड ग्रुपचे अध्यक्ष
विक्रम यादव, उपाध्यक्ष अलोक पैयदरकर, रक्ताचे नाते ट्रस्टचे राम बागड आदी मान्यवर उपस्थित होते.

युवा मोरया सामाजिक संस्थेमार्फत आजपर्यंत 40 वेळा रक्तदान शिबिर आयोजित करून 2500 पेक्षा जास्त युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे. तसेच 560 हुन अधिक गरजू रुग्णांना संस्थेमार्फत मोफत रक्त वितरित करण्यात आले आहे. तसेच 365 पेक्षा जास्त वयोवृद्ध आजी-आजोबांच्या डोळ्यावर मोफत शास्त्रक्रिया करण्यात आली आहे.

-Ads-

युवा मोरया सामाजिक संस्थेच्या माध्यमातून रक्तदान शिबिर, महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर रक्तपुरवठा, नेत्रतपासणी, शस्रक्रिया, मोफत आरोग्य शिबीर, हिमोग्लोबिन तपासणी, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रिमांड होममध्ये फळे वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. या सामाजिक कार्याची दखल घेत विक्रांत देशमुख यांना महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा युवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या सामाजिक कार्याची दखल घेत नॅंशनल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

या यशाबद्दल विक्रांत देशमुख यांचे डॉ. यशवंत पाटणे, ऍड. नितीन शिंगटे, रमेश बोराटे, प्रा. राजन धादमे, सविता शिंदे, योगेश मोदी, शरद जानी, विरेन जानी, डॉ. शिवाजी शिंदे, तसेच सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)