विक्रमी 22 व्यांदा एव्हरेस्टवर विजय मिळवण्यास कामी रीता शेर्पा सज्ज

नवी दिल्ली – नेपाळचे कामी रीता शेर्पा हे विक्रमी 22 व्यांदा एव्हरेस्ट शिखरावर विजय मिळवण्यास सज्ज झाले आहेत. 8848 मीटर्स उंचीचे एव्हरेस्ट हे जगातील सर्वाधिक उंचीचे पर्वतशिखर असून गिर्यारोहकांना ते सतत आव्हान देत असते. जर कामी रीता शेर्पा यांनी पुन्हा एव्हरेस्ट काबीज केले, तर एक नवीन विश्‍वविक्रम त्यांच्या नावावर होणार आहे.

सध्या 21 वेळा एव्हरेस्टवर विजय मिळवण्याचा जागतिक विक्रम कामी रीता शेर्पा यांच्यासह अपा शेर्पा आणि फुरबा ताशी शेर्पा यांच्या नावांवर संयुक्तपणे आहे. नंतर तो कामी रीता शेर्पा यांच्या एकट्याच्या नावावर होणार आहे. अमेरिकन आणि जपानी गिर्यारोहकांसह एकूण 29 जणांची टीम एव्हरेस्ट विजय मिळवण्यास सज्ज झाली आहे. कामी रीता शेर्पा हे देखील या टीमचे एक महत्त्वाचे सदस्य आहेत.

1994 ते 2017 या काळात कामी रीता शेर्पा यांनी 21 वेळा एव्हरेस्ट वर पाऊल टाकलेले आहे. त्यांचा शेवटचा एव्हरेस्ट विजय एक वर्षापूर्वी, म्हणेजे 27 मे 2017 रोजी झाला होता.

मात्र एक जागतिक विक्रम करूनच थांबण्याची कामी रीता शेर्पाकामी रीता शेर्पा यांची तयारी नाही. 25 वेळा एव्हरेस्ट काबीज करण्याचा त्यांचा ठाम निश्‍चय आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)