विक्रमबाबा पाटणकर यांना अटक करा

कृषी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

सातारा, दि. 1 (प्रतिनिधी) – पाटण तालुका कृषी अधिकाऱ्यांना मारहाण करणारे विक्रमबाबा पाटणकर व सहकाऱ्यांना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी शनिवारी जिल्ह्यातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्र आले. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान, पाटणकर यांना तात्काळ अटक न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवणार असल्याचा इशारा संघटना प्रतिनिधींनी निवेदनाद्वारे दिला.

पाटण तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्यात दिरंगाई होत असल्याचा आरोप करत विक्रमबाबा पाटणकर व कार्यकर्त्यांनी गुरुवारी पाटण तालुका कृषी अधिकारी प्रवीण आवटे यांच्या श्रीमुखात लगावली होती. घटनेचा निषेध करण्यासाठी कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी मोर्चा काढला. मारहाणीच्या घटनेमुळे संपूर्ण राज्यात कृषी विभागात असंतोष पसरला आहे. तसेच पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद होवूनही अद्याप पाटणकर व सहकाऱ्यांना अटक झालेली नाही. त्यामुळे भविष्यात अशा प्रकारच्या मारहाणीच्या घटनांचे प्रमाण वाढू शकणार आहेत. त्यामुळे तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)