विकास व पर्यावरणासाठी एकात्मिक दृष्टीकोन बाळगण्याची गरज-नितीन गडकरी

File photo

पणजी – पर्यावरण व पर्यावरणशास्त्र हे आमच्यासाठी उच्च प्राधान्य क्रमावर आहे. परंतु त्याचसोबत गरीब व्यक्तीचा देखील विचार आम्हाला करणे आवश्यक वाटते. पर्यावरणाची काळजी घेऊन रोजगार निर्मितीचा आमचा प्रयत्न आहे; त्यासाठी गोव्यातील सर्व समाज भागीदारांनी एकत्रित येऊन विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग, नौकानयन व जलस्रोत तसेच गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी यांनी आज वास्को येथे केले.येथील बायना समुद्र किनारी उभ्या केलेल्या नव्या जेटटी व फेरी बोट सेवेचे औपचारिक उद्घाटन आज नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

गडकरी म्हणाले, भारताला सुमारे सात हजार किलोमीटर इतका समुद्र किनारा लाभला आहे. यांचा विकास करून पर्यटन वाढू शकते. गोवा राज्य पर्यटन राज्य म्हणून उदयाला आले ते या समुद्र किनाऱ्यांमुळेच. या क्षेत्रात भांडवल गुंतवणूक होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होण्यास मदत होते, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले. गरिबी, भूक, बेरोजगारी ही देशासमोरची मोठी आव्हाने असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जलमार्गांचा वापर हा आर्थिकदृष्ट्या परवडणारा, पर्यावरणपूरक असा आहे; त्यामुळे त्यांचा अधिक वापर करून गोव्याच्या पर्यटन विकासात त्याचा सहभाग अपरिहार्य आहे, असा विचार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. जलमार्गाद्वारे प्रवास केल्यास पर्यटक प्रवासाचा आनंद घेऊ शकतील, वेळ व पैसा वाचू शकतो तसेच रस्त्यावरील वाहतूक कोंडी सह प्रदूषण देखील टाळता येणार असल्याचं त्यांनी म्हंटल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)