विकास प्रक्रियेतून वगळल्यामुळेच बंडखोरी वाढते

जर्मनीत राहुल यांचे वक्तव्य

नवी दिल्ली – जगात कोठेही विकास प्रक्रियेमधून मोठ्या संख्येत लोकांना वगळल्यास बंडखोरीचे गट तयार होतात, असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. जर्मनीतील हॅम्बुर्ग इथे ब्युसेरिस समर स्कूलमधील एका समारंभातील भाषणादरम्यान इसिस या आंतरराष्ट्रीय दहशातवादी संघटनेचे उदाहरण देताना त्यांनी हे विधान केले. भाजप सरकारने आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांकांना विकास प्रक्रियेतून वगळले आहे. 21 व्या शतकामध्ये अशाप्रकारे लोकांना वगळणे, हे अत्यंत धोकादायक ठरू शकते, असेही राहुल गांधी म्हणाले.

“जर 21 व्या शतकामध्ये लोकांना दृष्टीकोन दिला गेला नाही, तर इतर कोणीतरी ते काम करेल. मोठ्या संख्येत विकास प्रक्रियेपासून लोकांना वगळण्याचा हाच खरा धोका आहे.’ असे गांधी म्हणाले. भारतात गरिबांना समान संधी उपलब्ध नसते असे सांगून समूहाकडून घडणाऱ्या घटनांचा संबंध त्यांनी बेरोजगारीशीही जोडला. भाजप सरकारने नोटबंदी आणि “जीएसटी’च्या माध्यमातून अनौपचारिक अर्थकारण बिघडवले आणि सर्वसामान्यांकडील संधी हिरावून घेतल्या असा आरोपही त्यांनी केला.

आदिवासी, गरीब शेतकरी, मागास जाती आणि अल्पसंख्यांकांना उच्चभ्रूंसारखे लाभ मिळता कामा नयेत, असे भाजपला वाटते आहे. या गटांच्या सहाय्यासाठी असलेल्या यंत्रणांवरच हल्ले केले जायला लागले आहेत, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. बंडखोरी रोखण्याचा एकमेव उपाय म्हणजे लोकांना समजून घ्यायला हवे, असेही ते म्हणाले.
आपल्या तासाभराच्या व्याख्यानानंतर राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना उत्तरेही दिली.

इसिसचा जन्म होण्याचे कारण 2003 मध्ये…
अमेरिकेने 2003 साली इराकवर हल्ला केला. आता इराकमध्ये एका विशिष्ट समुदायाला नोकऱ्या मिळू नयेत, असा कायदा करण्यात आला आहे. वरवर पाहता हा निरुपद्रवी निर्णय वाटू शकतो. पण त्यामुळे मोठ्या संख्येने लोक बंडखोरीमध्ये उतरले. हीच बंडखोरी इराक आणि सीरियातही झाली आणि नंतर सामुहिक स्वरुपात झाल्यावर त्या बंडखोरीने “इसिस’चे रुप धारण केले, असे राहुल गांधी म्हणाले.

जगभरात अमेरिका, भारत आणि चीनच्या परराष्ट्र धोरणाकडे बघितले जाते. अमेरिका आणि चीनचे धोरण युरोपासारखेच असते. पण भारताचे धोरण समतोल असायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)