विकास कृष्णनचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले

दुखापतीमुळे कांस्यपदकावर मानावे लागले समाधान

जकार्ता: आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्‍सिंगमध्ये सुवर्णपदक मिळवण्याच्या आशा संपुष्टात आल्या. भारताचा बॉक्‍सर विकास कृष्णन हा तंदुरुस्त नसल्याने सेमिफायनलमध्ये खेळणार नाही. यामुळे त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

भारतीय बॉक्‍सर विकासचा कझाकिस्तानच्या अमानकुल अबिलखान याच्याशी सामना होणार होता. मात्र, दुखापतीमुळे त्याला खेळता येणार नाही. याबाबत आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळाडूंबरोबर असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, विकासला काही आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दुखापत असताना सेमीफायनलला खेळणे धोकादायक होते. उपांत्यपूर्व फेरीत त्याला गंभीर जखम झाली होते. विकास जरी सेमीफायनलला उतरला नसला तरी त्याने आपल्या नावावर विक्रम नोंदवला आहे. सलग 3 आशियाई स्पर्धेत पदक जिंकणारा पहिलाच भारतीय बॉक्‍सर बनला आहे.
2010 च्या आशियाई स्पर्धेनंतर दुसरे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न बॉक्‍सर विकास कृष्णनला अर्ध्यावर सोडावे लागले. उपांत्य फेरीच्या लढतीत खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याने विकासने माघार घेतली आणि त्याला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले. उपांत्य फेरीत विकाससमोर कझाकिस्तानच्या अमानकुल अबिलखानचे आव्हान होते, परंतु विकासने माघार घेतल्याने अबिलखानला पुढे चाल देण्यात आली.

पुरुषांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश करून विकासने भारतासाठी पदक निश्‍चित केले होते. मात्र, डोळ्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला पुढे खेळणे शक्‍य झाले नाही. विकासने आठ वर्षांपूर्वी ग्वांझाऊ येथे सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतर 2014 मध्ये आणि आता 2018 मध्ये त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
भारतीय बॉक्‍सर्समध्ये आशियाई स्पर्धेत 26 वर्षीय विकासने सातत्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत चीनच्या एर्बिक तांगलातीहानविरूद्ध विकासच्या डोळ्याला दुखापत झाली होती. त्यातही त्याने विजय मिळवला होता. मात्र, उपांत्य फेरीपूर्वी दुखापत बरी न झाल्याने त्याला माघार घ्यावी लागली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)