विकास कामांसाठी उदंड जाहले सल्लागार

– सल्लागारांच्या पॅनेलमध्ये आणखी एकाची भर

पिंपरी – महापालिकेच्या वतीने शहरात रस्ते, पावसाळी पाण्यासाठी वाहिनी, पूल, स्काय वॉक आणि इमारती आदी विविध प्रकारची विकास कामे करण्यात येत आहेत. या कामांसाठी 25 सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये आणखी एका सल्लागाराची भर पडली आहे.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने विविध विकास कामे करण्यात येत आहेत. खास दुरूस्तीसाठी पुरेसे तांत्रिक नैपुण्य महापालिकेकडील अभियंत्यांकडे उपलब्ध आहे. मात्र, काही वेळा अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे अथवा काही प्रसंगी गुंतागुंतीचे तांत्रिक प्रश्‍न निर्माण झाल्याने आधुनिक तंत्रज्ञानाची गरज, पर्यावरण विषयक अभ्यास अशा तत्सम बाबींची गरज भासते. तसेच सुसाध्यतेची पडताळणी, संशोधनात्मक अभ्यास आणि खासगीकरणातून करण्यात येणाऱ्या प्रकल्पांसाठी कायदेविषयक, अर्थविषयक अन्वेषण अशा बाबींसाठी तज्ज्ञ सल्लागार किंवा संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ नेमण्याची आवश्‍यकता भासते.

महापालिकेमध्येही तज्ज्ञ सल्लागारांचे पॅनेल तयार करण्यासाठी व्याज अभिव्यक्तीस (एक्‍सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) आयुक्तांची मान्यता घेण्यात आली आहे. हे पॅनेल नियुक्त करण्यासाठी महापालिका संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार एकूण 43 सल्लागारांनी सहभाग घेतला आहे. या 43 सल्लागारांपैकी टप्पा एकमध्ये एकूण 25 सल्लागारांची स्थायी समिती सभेच्या 7 फेब्रुवारी 2018 रोजीच्या ठरावानुसार, महापालिकेच्या तज्ज्ञ सल्लागार पॅनेलवर नेमणूक करण्यात आली आहे.

टप्पा दोन मध्ये नव्याने सचिन आपटे ऍण्ड असोसिएटस्‌ सल्लागार यांनी कागदपत्रे सादर केली आहेत. या सल्लागारांच्या कागदपत्रांची छाननी करण्यात आली आहे. त्यानुसार, या कामांची रस्ते, पावसाळी पाण्यासाठी वाहिनी आणि इतर स्थापत्य विषयक कामे तसेच पूल, स्काय वॉक आणि इमारती अशी वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार, सचिन आपटे ऍण्ड असोसिएटस यांना या दोन्ही कामांवर सल्लागार म्हणून घेण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)