विकास कामांमुळे इंदापूर तालुक्‍याच्या वैभवात भर

डिकसळ- तालुक्‍यातील जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी गावोगावी सहकारी संस्थेच्या माध्यमातून विकास करण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यामुळे लोकांच्या समस्या कमी झाल्या आहेत. तसेच विकास कामांमुळे तालुक्‍याच्या वैभवात भर पडत असल्याचे प्रतिपादन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले.
अकोले येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या शाखेचे उद्‌घाटन आमदार भरणे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे होते. प्रसंगी पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य हनुमंत बंडगर, सरपंच गीता दराडे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, संचालिका सुमन दराडे, पांडुरंग दराडे, बॅंकेचे अधिकारी विजय टापरे, विभागीय अधिकारी गणेश देवकर, शाखा व्यवस्थापक अरुण येवले, संतोष आव्हाड, द्रौपदा वणवे, नानासाहेब दराडे, युवराज कोकरे, दादा वणवे, कैलास वणवे, बाळासाहेब दराडे, शामराव दराडे, गणेश दराडे, दत्तात्रय दराडे, विशाल दराडे, मधुकर गायकवाड समेत सर्व ग्रामपंचायत व सेवा सहकारी संस्थेचे सदस्य, बॅंकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
आमदार भरणे पुढे म्हणाले कि, मागील खूप दिवसापासून अकोले परिसरात बॅंक सुरु करण्याची लोकांची मागणी होती. त्यामुळे लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन बॅंकेची शाखा सुरु करण्यात आली आहे. यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांची गैरसोय कमी होऊन बॅंकेच्या माध्यमातून सुलभ सुविधा देण्यात येणार आहेत. जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न सहकारी संस्थेच्या माध्यमातून करण्यात येणार असून सहकारी सेवा सोसायटी येथील बॅंकेच्या बरोबरीने काम करून लोकांना सेवा देणार असून लोकांना बाहेरगावी जाण्याची जास्त गरज पडणार नाही. त्यामुळे जनतेचा विकास हाच आपला ध्यास असून जरी सत्तेत नसलो तरी तालुक्‍यातील विकास करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही आणि केलेला विकास सांगायची जास्त गरज नाही. जे करीत नाहीत ते जास्त सांगत असतात कि आम्ही विकास केला असा टोला ही आमदार भरणे यांनी विरोधकांना लगावला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)