विकास आराखड्याप्रमाणे आता वृक्षलागवडीचाही आराखडा तयार होणार

राज्य सरकारने महापालिकांना दिले आदेश

मुंबई – राज्यातील शहरांचा तयार होणाऱ्या विकास आराखड्याप्रमाणे (डीपी) आता ट्री प्लान्टेशन (टीपी) वृक्षलागवड आराखडा तयार होणार आहे. असे आराखडे तयार करण्याचे निर्देश महापालिकांना देण्यात आले आहेत, अशी माहिती अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. मंत्रालयात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्रत्येक महापालिकेचा विकास आराखडा असतो त्याच धर्तीवर आता टीपी म्हणजे ट्री प्लान्टेशन आराखडाही तयार करण्यास सांगण्यात येणार आहे. संबंधित महापालिकेती मोकळ्या जागा, लोकसंख्या, प्रदूषणाचे प्रमाण आदी घटकांचा विचार करून हा आराखडा महापालिकेनेच तयार करायचा आहे. वृक्षांच्या विशिष्ट अशा 156 प्रजातींची माहिती असणारे पुस्तक वनविभागाने तयार केले आहे. त्या महापालिकेच्या आवश्‍यकतेनुसार यातील झाडे लावायची आहेत. मुंबईसारख्या महानगरात आता मोकळी जागा जास्त उरलेली नाही. मात्र ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडसारख्या महापालिका या बाबत भरीव कामगिरी करू शकतात असेही मुनगंटीवार म्हणाले.

राज्यात गेल्या 1 जुलै पासून 13 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प सोडण्यात आला होता. तो आता पूर्ण झाला आहे. राज्यातील आबालवृद्धांनी यात सहभाग नोंदविल्यानेच हे कार्य पूर्ण करता आले असे मुनगंटीवार म्हणाले. “फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या सर्व्हे’मध्ये महाराष्ट्रातील वनेतर क्षेत्रातील वृक्षांच्या प्रमाणात गेल्या दोन वर्षात वाढ होउन हे क्षेत्र 273 चौ.कि.मीने वाढले आहे. कांदळवनांच्या वाढीत संपूर्ण देशाच्या तुलनेत पन्नास टक्के वाढ एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. दोन्ही बाबतीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. येत्या वर्षभरात आता 33 कोटी वृक्ष लावण्याचा संकल्प आहे, अशी एकूण 50 कोटी वृक्षलागवड करण्यात येणार असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

ट्री क्रेडिट पॉलिसी तयार होणार
केमिकल उद्योगांकडून प्रदूषण होत असते. अशा उद्योगांना पर्यावरण रक्षणात वाटा उचलण्यासाठी ट्री क्रेडिट पॉलिसी तयार करण्यात येत आहे. उदाहरणार्थ जर शेतकऱ्यांनी शंभर झाडे लावली असतील तर त्याचे प्रमाणपत्र त्या शेतकऱ्यांना देण्यात येईल. संबंधित उद्योग या शंभर झाडांसाठी निधी देउन ती झाडे विकत घेउ शकेल. यामुळे पर्यावरण रक्षणासोबतच शेतकऱ्यांना पैसेही मिळतील. हे धोरण तयार करण्यासाठी समिती नेमण्यात आली असल्याचेही मुनगंटीवार म्हणाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)