विकासासाठी नागरिक परिवर्तन करतील- दिलीप गांधी

खासदार गांधी यांनी प्रचारावेळी व्यक्‍त केला विश्‍वास

नगर: भारतीय जनता पक्ष विकासाच्या मुद्यावर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत. ही विकासाची गंगा नगरमध्ये वाहण्यासाठी महापालिकेत भाजपची सत्ता येणे आवश्‍यक आहे. आता जनतेनेच निर्णय घेऊन विकासासाठी सक्षम असणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्याच उमेदवारांना निवडून द्यावे. सावेडी उपनगर ज्या वेगाने वाढत आहे; त्या मानाने येथील नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा तोडक्‍या आहेत. यासाठीच सावेडीच्या विकासासाठी परिवर्तन करून सावेडी उपनगरमधील सर्व नगरसेवक भाजपचे निवडून द्या, असे आवाहन खासदार दिलीप गांधी यांनी केले.

-Ads-

भारतीय जनता पक्षाचे प्रभाग सहाचे उमेदवार स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, रवींद्र बारस्कर, डॉ. आरती बुगे, वंदना ताठे यांचा प्रचाराचा प्रारंभावेळी खासदार गांधी बोलत होते. सावेडी गावठाण परिसरातून नागरिकांच्या उपस्थित प्रचारफेरी काढण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, ऍड. अभय आगरकर, सावेडी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, मोहन मानधना, बाळासाहेब वाकळे, विठ्ठल बारस्कर, दिलीप बारस्कर, अशोक वाकळे, जगन्नाथ बारस्कर, राजू बारस्कर, भानुदास बारस्कर, आशा कराळे, राजेंद्र वाकळे, गजानन वाकळे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)