विकासामध्ये वैशिष्ट्यपूर्ण कामाची गरज : ना. पाटील

कराड : सर एम. विश्वेश्वरैया पुरस्कार जलसंपदाचे अधिक्षक अभियंता सुनिल कुशीरे प्रदान करताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील. समवेत ना. शेखर चरेगावकर, ना. डॉ. अतुल भोसले व मान्यवर. (छाया : राजू सनदी)

कराड, दि. 21 (प्रतिनिधी)- देश व राज्याच्या विकासात यापुढे नवीन वैशिष्टपूर्ण गोष्टी निर्माण कराव्या लागणार असून त्याची जबाबदारी आर्किटेक्‍ट व अभियंत्यावर आहे, असे आवाहन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील पूल कम बंधारा असेल तरच यापुढे नवीन पुलाला मंजूरी देण्यासाठी राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभागही आग्रही असल्याचे त्यांनी नमूद केले.
येथील कराड आर्किटेक्‍टस ऍण्ड इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे आयोजित सर विश्वैश्वरय्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल रूक्‍मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, एल ऍण्ड टी कंपनीचे डी. एम. कोरे, असोसिएशनचे अध्यक्ष दिपक रैनाक, उपाध्यक्ष राजेश पटेल उपस्थित होते.
मंत्री पाटील म्हणाले, असोशिएशनने पुरस्काराला उंची प्राप्त करून दिली आहे. देशात विकास करताना नियमित करण्यापेक्षा भव्यदिव्य करावे या टप्प्यावर आलो आहोत, ते काम आर्किटेक्‍ट करत असतात. अभियंत्यांना आवश्‍यक ते पुरवत असतात. पुर्वी गेट वे ऑफ इंडीयाने मुंबईची ओळख होती आता सी लिंकने मुंबईची ओळख आहे. तो आपल्यातील लोकांनी निर्माण केला. देशातील विकासात होताना नवीन वैशिष्टपूर्ण गोष्टी निर्माण कराव्या लागतील. त्यात आर्किटेक्‍टचे खूप महत्व आहे. पूल बांधण्यापेक्षा पूल कम बंधारा बांधण्याची संकल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आणली असून यापुढे पूल कम बंधारा असेल तरच मंजूरी देईल, असा सार्वजनिक बांधकाम विभागही आग्रह राहील. त्यामुळे पुलावरील वाहतुकीबरोबर साठलेल्या पाण्याचा शेतकऱ्यांना वापर करता येईल. दोन ठिकाणी संकल्पना मांडली आहे, त्यात गोव्यातील पुलाची आहे. लिफ्टने वर शहर दिसेल. ते पुण्यातही चांदणी चौकात अशी लिफ्ट दिसेल. अशा नवनवीन कल्पना आर्किटेक्‍टमधून येत असतात. पैसा मुद्दा महत्वाचा नाही, नवनवीन कल्पना आवश्‍यक आहे. सार्वजनिक बांधकाम विभागही अत्याधुनिक यंत्रणेद्वारे कामे करत आहेत. पैशाची चिंता करण्योची गरज नाही.
सेल्फी काढायलाही खड्डा पडणार नाही…
सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्याधुनिक यंत्रणेचा वापर सुरू केल्याचे सांगताना मंत्री पाटील म्हणाले, सहा कोटींचे मशिन आणले असून त्याद्वारे नाशिक जिल्ह्यातील तळवळ येथे रस्त्याचे काम सुरू आहे. ते मशिन संपूर्ण रस्ता खरवडत जात असून खरवडलेल्या रस्त्याच्या डांबर व साहित्यात विशिष्ट प्रकारचे केमिकल मिश्र केल्यास त्यातूनच पुन्हा रस्ता तयार होत आहे. मशिन दिवसाला एक किलोमीटर असा रस्ता तयार करते. तो रस्ताही 20 वर्षे टिकेल असा असेल. त्यामुळे विरोधकांनी ठरवले तरी त्या रस्त्याला खड्डा मारून सेल्फी काढायचा तरीही रस्त्यावर खड्डा मारू देत नाही, असा टिकावू रस्ता होईल. तो प्रयोग यशस्वी झाला की राज्यभर त्याचा वापर होईल. मराठा आरक्षण झाले, कर्जमाफी दिल्यामुळे विरोधक हतबल आहेत. त्यामुळे सेल्फीसारखे कार्यक्रम सुरू असतात असा टोलाही त्यांनी लगावला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)