विकासात अडथळे ठरणाऱ्या सचिवालयातील अधिकाऱ्यांना हटवा

शिवसेनेची भाजपला सुचना
मुंबई – महाराष्ट्राच्या सचिवालयतील जे अधिकारी विकासात अडथळा ठरत आहेत त्यांना भाजपने बिनदिक्कतपणे तेथून हटवावे अशी सुचना शिवसेनेने केली आहे. सरकारी योजनांची नीट अंमलबजावणी होत नसल्याबद्दल जेव्हा केव्हा शिवसेनेकडून सरकारवर टीका केली जाते त्यावेळी आमची त्या मागची भूमिकाही भाजपने समजून घेतली पाहिजे अशी अपेक्षाही शिवसेनेने आपल्या मुखपत्रातील अग्रलेखात व्यक्त केली आहे.

मंत्रालयातील नोकरशाहीच नकारात्मक भावनेतून काम करीत असते त्यामुळे ते विकास प्रक्रियेत मोठा अडथळा ठरत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी यांनी केला होता. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेने ही सूचना केली आहे. काल नागुपरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य मंत्र्याच्या उपस्थितीत गडकरी यांनी हा आरोप केला होता. शिवसेनेने म्हटले आहे की राज्यात यापुर्वी जेव्हा भाजप-सेना युतीचे सरकार होते त्यावेळी अशा अधिकाऱ्यांना कठोरपणे दूर करण्यात आले होते. विकासकामात असे अडथळे येतात हा आरोप करणे सोपे असते पण उत्तम प्रशासकांनी असे अडथळे कठोरपणे दूर करायचे असतात असा सल्लाही यात भाजपला देण्यात आला आहे.

राज्यातील भाजप प्रणित सरकारने गेल्या साडेतीन वर्षात अनेक आश्‍वासने विधीमंडळात दिली पण त्यातील अनेक आश्‍वासने तशीच पडून असल्याची टीकाही यात करण्यात आली आहे. राज्याच्या तिजोऱ्या सध्या रिकाम्या आहेत अशा स्थितीत सरकार विकास कामांसाठी पैसा कोठून आणणार असा सवालही शिवसेनेने उपस्थित केला आहे. नागपुरात पोलिस भवन उभारण्यासाठी 89 कोटी रूपयांचा निधी मिळवण्यासाठी जिथे मुख्यमंत्र्यांनाच स्वत:ला झगडावे लागते तिथे सामान्य माणसांना काय न्याय मिळणार असा सवालही यात करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)