विकासनगर येथे गळफास लावून युवतीची आत्महत्या

देहुरोड – विकासनगर येथे एका 19 वर्षीय युवतीने राहत्या घरात बेडरूममधील खिडकीला दोरीच्या साह्याने गळफास घेतला. मंगळवारी (दि. 9) सायंकाळी उघडकीस हा प्रकार उघडकीस आला.

तृप्ती संजय धिल्लोड (वय 19, रा. टेल्को बिल्डींग, स्मृती हौसिंग सोसायटी, विकासनगर) असे गळफास घेतलेल्या युवतीचे नाव आहे.

-Ads-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी तृप्ती एका नामांकित कंपनीत रुजू झाली होती. तिच्या वडिलांची प्रकृती अचानक खालवल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तृप्तीची आई, तिची एक बहीण आणि भावासोबत रुग्णालयात असताना तृप्ती घरात एकटीच होती. तिने राहत्या घरात दरवाजाचा आतून बंद केला. बेडरुममध्ये कॉटवर लगतच्या खिडकीतील ग्रीलला नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेतला. तृप्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या प्रकरणी देहुरोड पोलीस तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)