विकासदराची आकडेवारी जास्त फुगलेली वाटते: ढोलकिया

नवी दिल्ली: केंद्रीय सांख्यिकी विभागाने परवा भारताचा पहिल्या तिमाहीतील विकासदर तब्बल 8.2 टक्‍के झाल्याची आकडेवारी जाहीर केली आहे. यावर काही तज्ज्ञांनी अगोदरच शंका व्यक्‍त केल्या आहेत. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीचे एक स्वतंत्र सदस्य रवींद्र ढोलकिया यांनीही आकडेवारी जरा जास्त वाटते असे म्हटले आहे. त्यातल्या त्यात या आकडेवारीतील मॅन्युॅफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता वस्तुस्थितीपेक्षा जास्तच असल्याचे त्यांना वाटते.

नव्या पद्धतीनुसार कंपन्यांच्या वार्षिक ताळेबंदातील मॅन्युफॅक्‍चरिंगचा विचार राष्ट्रीय उत्पन्नाच्या मूल्यांकनासाठी केला जातो. आताच्या मूल्यांकनानुसार पहिल्या तिमाहीत मॅन्युफॅक्‍चरिंग क्षेत्राची उत्पादकता तब्बल 13.5 टक्‍क्‍यांनी वाढली आहे. अमेरिकेने अनेक महिन्यापासून भारतासह अनेक देशाविरोधात व्यापारयुद्ध पुकारले असल्यामुळे निर्यात कमी होऊन व्यापारी तूट वाढत आहे. त्याचा परिणाम रुपयाच्या मूल्यावरही होत आहे. त्याचबरोबर उद्योगांकडून भांडवलाचा वापर अनेक कारणामुळे कमी होत आहे. असे असताना कंपन्याची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सरकारने सांगितले आहे.त्यावर अनेक तज्ज्ञानी शंका व्यक्त केल्या आहेत.

त्याचबरोबर गेल्या वर्षी या तिमाहीत विकास दर फारच कमी होता. त्यामुळे आता तो जास्त वाढल्याचे भासत आहे. पुढील दोन तिमाहीत विकासदर कमी होण्याची शक्‍यता असल्याचे माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यासह अनेकांनी सांगितले आहे.
आता या आकडेवारीवर ढोलकिया यांनी शंका व्यक्त केली आहे. मात्र केंद्र सरकारने गेल्या चार वर्षात बऱ्याच मोठया प्रमाणात आर्थिक सुधारणा राबविल्यामुळे हा वाढीव विकासदर साध्य झाला असल्याचे अर्थ व कंपनी व्यवहारमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनी आगामी काळात विकासदर अधिक वेगाने वाढणार असल्याचा दावा केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)