“विकास’च्या इमारत बांधकामात घोटाळा ; शरद पवार यांचे लक्ष वेधून उपनिबंधकांकडे तक्रार करणार

गुरुकुल मंडळाचा आरोप 

नगर: विकास मंडळाकडून बांधण्यात येणाऱ्या नवीन इमारतीसाठी बॅंकेतील सभासदांच्या ठेवी परस्पर वापरल्या जात आहेत. इमारतीच्या बांधकामात पारदर्शकता नाही. बांधकाम परवानगीसाठीच 41 लाखांचा खर्च केला आहे. पाडलेल्या इमारतीतून निघालेला पाच लाख रुपयांचे भंगार रेकॉर्डवर सव्वा लाख रुपयांचेच दाखविले आहेत. शताब्दीच्या अगोदरच महोत्सव साजरा करण्यासाठी सभासदांच्या ठेवीवर डल्ले मारले जात आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे नेते शरद पवार यांची भेट घेऊन शिक्षक बॅंक आणि विकास मंडळाच्या न्यायप्रविष्ट कारभाराकडे लक्ष वेधणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

इमारतीच्या बांधकामातील घोटाळ्याच्या चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधकांकडे पुराव्यानिशी तक्रार करणार असल्याची माहिती गुरूकुलचे नेते संजय कळमकर पत्रकार परिषदेत दिली. राज्याचे नेते रा. या. औटी, शिक्षक समितीचे अध्यक्ष संजय धामणे, बॅंकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र ठाणगे, गुरूकुल मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन शिंदे आदी यावेळी उपस्थित होते.

कळमकर म्हणाले, “विकास मंडळाची इमारत व्हावी, ही जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक शिक्षकांची इच्छा आहे. तशी ती गुरूकुल मंडळाचेही आहे. परंतु या इमारतीच्या बांधकामाचा आर्थिक व्यवहार पारदर्शक नाही. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी ऐच्छिक निधी ठेवून देखील 80 टक्के सभसादांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.’ शिक्षक बॅंक आणि विकास मंडळाच्या माध्यमातून इमारत बांधकामाच्या नावाखाली सुरू असलेल्या घोटाळ्याविषयी गुरूकुलने पोलिसांकडे रितसर तक्रार करण्याची तयारी केली आहे. परंतु शिक्षकांची बदनामी होऊ नये म्हणून, या बांधकामातील प्रत्येक व्यवहारातील टक्‍क्‍यांची चौकशीसाठी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार करणार आहे. पुणे येथील धर्मादाय आयुक्तांकडे देखील ऐच्छिक निधीबाबत तक्रार करून प्रशासकीय पातळीवरून विकास मंडळाने ऐच्छिक निधीचा हिशोब घेणार असल्याचेही कळमकर यांनी सांगितले.


बॅंकेचे अध्यक्ष सेवेतून रावसाहेब रोहोकले आणि रावसाहेब सुंबे लवकरच निवृत्त होत आहे. निवृत्त झाल्याच्या दिवशीच सभासदत्व रद्द होते. असे असताना रोहोकले आणि सुंबे यांच्यासाठी सत्ताधाऱ्यांनी विकास मंडळाच्या घटनेत बदल करण्याचा घाट घातला आहे. निवृत्तीनंतरही मलिदा लाटता यावा यासाठी रोहोकले आणि सुंबे यांची चालेली ही धडपड त्यांच्यातील कोडगेपणा दाखवते.
– संजय धामणे अध्यक्ष, शिक्षक समिती


विकास मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या इमारतीचे बांधकाम म्हणजे शिक्षक बॅंकेच्या आर्थिक ठेवींना धक्का लावून सत्ताधाऱ्यांची खेळी आहे. सत्ताधाऱ्यांच्या या प्रकारामुळे बॅंकेचे आर्थिक अस्तित्त्व धोक्‍यात येण्याची शक्‍यता आहे. निवृत्त झाल्याशिवाय शिक्षकांना बॅंकेतील ठेवी काढता येत नाही. तरी देखील सत्ताधाऱ्यांनी तसे करत आहेत. जिल्हा उपनिबंधकांकडे याबाबत तक्रार करणार आहे.
– रा. या. औटी, राज्य नेते, गुरूकुल मंडळ


विकास मंडळ इमारतीचे बांधकाम सर्व विभागाच्या ना हरकती घेऊन सुरू होत आहे. प्रत्येक व्यवहाराची पारदर्शकता जपली आहे. विरोधकांनाच ती खटकते आहे. संजय कळमकर यांना पारदर्शतेचा हिशोब पाहिजे असल्यास त्यांनी ऐच्छिक निधी म्हणून एक लाख रुपये द्यावेत. त्यानंतर हिशोब देण्यासाठी ते जिथे म्हणतील, तिथे सर्व सभासदांच्या उपस्थित समोरासमोर बसण्याची तयारी आहे.
– संजय शिंदे, अध्यक्ष, विकास मंडळ


यात्रेची वर्गणी देतो ती ऐच्छिक असते. वर्गणी दिल्यानंतर तिचा कोणीच हिशोब मागत नाही. विकास मंडळाच्या इमारतीसाठी देखील निधी देणे हे ऐच्छिक आहे. सभासदांनी आतापर्यंत 4 कोटींची निधी ऐच्छिक स्वरुपात दिला आहे. त्यात 35 ते 40 जणांनी लाखांवर निधी दिला आहे. हे गुरूमाऊलीचे नेतृत्वच करू शकते. विरोधकांना हिशोब पाहिजे असल्यास समोर यावे, तो देण्यास तयार आहे.
– संजय शेळके


 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)