विकासकामात मताचे राजकारण कधीच आणले नाही : आ. शंभूराज देसाई

शिरळ सरपंचासह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

काळगाव – पाटण तालुक्‍याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुक्‍याचा आमदार म्हणून विकासकामे करताना त्यामध्ये मताचे राजकारण कधीच आणले नाही. तालुक्‍यातील गावांना बारमाही जोडणारे रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजना प्रथमत: झाल्या पाहिजेत. हा माझा पहिल्यापासून प्रयत्न आहे. मुलभूत सुविधा पुर्ण करुन घेण्याकरिता जी गावे माझ्यापर्यंत आली. त्या गावांना विकासकामे दिल्यानेच शिरळ गावानेही शिवसेनेत जाहीर प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रतिपादन आ. शंभूराज देसाई यांनी केले.

शिरळ, ता. पाटण येथील विद्यमान सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी एकमुखी निर्णय घेत आ. शंभूराज देसाई यांचे नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहिर प्रवेश केला. याप्रसंगी आ. देसाई बोलत होते. यावेळी जयवंतराव शेलार, अशोकराव पाटील, सदानंद साळुंखे, हरीष भोमकर, दिलीप सपकाळ, गणपत सुर्यवंशी, पांडुरंग बेबले, अशोकराव पाटील, हणमंत सुर्यवंशी, बळीराम साळुंखे, रामचंद्र साळुंखे उपस्थित होते.

आ. देसाई म्हणाले, शिरळ हे गाव अनेक वर्षापासून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे नेतृत्व मानत होते. मात्र एवढ्या वर्षात या गावाचा साधा रस्ताही त्यांना करता आलेला नाही. या विभागातील सर्व रस्ते आ. देसाई यांनी केले. मग आपला रस्ता का होवू शकत नाही, याचा सारासार विचार या गावातील सरपंचासह ग्रामस्थांनी केला. इतक्‍या वर्षे विरोधकांचे नेतृत्व आपण मानून आपल्याला रस्ता मिळत नसेल तर विकास करणाऱ्या नेतृत्वाचे पाठीमागे आपण ठाम उभे रहावे. याकरिता सरपंच सदस्यासह गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेत रस्त्यासाठी मागणी केली.

यावेळी शिरळचे सरपंच नवनाथ सुर्यवंशी, सदस्या अनिता गुरव, रंजना शेलार, सदस्य सिध्देश सुर्यवंशी, रशिद शेख या सदस्यांसह शेकडो ग्रामस्थांनी आ. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करुन यापुढे आ. देसाई यांचेच काम करण्याचा ठाम निर्णय घेतला. स्वागत दिलीप सपकाळ यांनी केले. आभार प्रकाश सागवेकर यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)