विकासकामाच्या श्रेयावरून देहूमध्ये वाद

देहुरोड – देहूगाव येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन समारंभ कार्यक्रमावरून अप्रत्यक्ष पंचायत समिती सभापती आणि ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्यांमध्ये वाद सुरू आहे. शिवसेनेच्या वतीने या कार्यक्रमावेळी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे.

देहुगाव येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ कार्यक्रम गुरुवारी (दि. 4) रोजी सायंकाळी साडेपाच वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र येथे होणार आहे. या कार्यक्रमाचे संयोजन पंचायत समितीचे सभापती, देहू राष्ट्रवादीचे महिलाध्यक्षा हेमलता काळोखे यांनी राष्ट्रवादी पक्षातंर्गत आयोजिले आहे. कार्यक्रमामध्ये आयोजित प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्ती, चव्हाण नगरमधील बंदिस्त गटार बांधणे, माळवाडी येथे जिल्हा परिषदची शाळा दुरुस्ती, अंगणवाडीचे नवीन बांधकाम ही कामे शासकीय निधीतून झाली आहेत. तर काही कामे होणार असताना राष्ट्रवादीच्या नावाखाली सभापती काळोखे श्रेय लाटत असल्याचे आरोप ग्रामपंचायतचे काही सदस्य आणि काही पक्षांचे कार्यकर्ते यांनी केला आहे.

शासकीय निधीतून झालेल्या कामांसंदर्भात पक्षीय कार्यक्रम कसा होऊ शकतो? असा प्रश्‍न उपस्थित करीत हा कार्यक्रम शासकीय झाला पाहिजे, असे मत काहींनी नाव न छापण्याच्या अटीवर मांडले आहे. यासंदर्भात शिवसेनेच्या गटनेत्या शैला खंडागळे यांनी जिल्हा परिषदेचे निवडून आलेले सदस्य मंगल जंगम यांचे सदस्य पद न्यायालयाने रद्द केले असताना ही कार्यक्रम पत्रिका, फलकावर विद्यमान सदस्य असल्याचे अवैधरित्या नाव छापले असल्याचे तसेच शासकीय कार्यक्रम पक्षाअंतर्गत करीत असल्याने निषेध नोंदवित कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करीत निषेध आंदोलन करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदरनाद्वारे केली आहे. त्यासंदर्भात निवेदन देहुरोड पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)