विकासकामांतून जनतेच्या प्रेमाची परतफेड

खासदार लोखंडे : बेलापूरला मुस्लीम समाज स्मशानभूमी संरक्षक भिंत काम सुरू
श्रीरामपूर – बेलापूर येथील जनतेने केलेल्या प्रेमाची परतफेड विकास कामाच्या रुपाने करणार आहे. मुस्लीम समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली.
गावातील मुस्लीम समाजाच्या स्मशानभूमी सरक्षंक भिंतीसाठी ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगातून तीन लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. कामाचे उद्‌घाटन खासदार लोखंडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. बाजार समितीचे सभापती सचिन गुजर, पंचायत समिती सदस्या वंदना मुरकुटे, अरुण नाईक, सरपंच भरत साळुंके, जनता अघाडीचे अध्यक्ष रवींद्र खटोड, जाफर आतार, सुधीर नवले यावेळी उपस्थित होते.
मोहसीन सय्यद, शफीक आतार, शफीक सय्यद, मुसा सय्यद, अबरार सय्यद व कार्यकर्त्यांनी खासदार लोखंडे, आमदार भाऊसाहेब कांबळे, सरपंच साळुंके यांच्याकडे स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीसाठी मदत करण्याची मागणी केली. पाठपुराव्यानंतर खासदार लोखंडे यांनी भिंतीसाठी तीन लाख रुपये निधीची घोषणा केली होती.
यावेळी जावेद शेख, लाल मोहम्मद जहागीरदार, अय्याज सय्यद, कैलास चायल, विवेक वाबळे, सेवा संस्थेचे अध्यक्ष विलास मेहेत्रे, आनिल पवार, किशोर बोरुडे, रफिक शेख चंद्रकांत नाईक, शेषराव पवार, दत्ता कुऱ्हे, शिवाजी वाबळे उपस्थित होते.
स्वच्छता मोहीम…
मुस्लीम समाजातील ज्येष्ठ व तरुणांनी स्मशानभूमी स्वच्छतेचे अभियान राबविले. एका दिवसात चार जेसीबी यंत्राच्या सहाय्याने कब्रस्तानमधील काट्या, लहान झाडेझुडपे काढण्यात आली. त्यास सरपंच भरत साळुंके व त्यांच्या टीमचे सहकार्य मिळाले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)