विकासकामांचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा पोरकटपणा

खा. शिवाजीराव आढळराव पाटील : हांडेवाडी रस्त्यावरील विकासकामांचा शुभांरभ

हडपसर – लुल्लानगर येथील उड्डाणपूल शिवसेनेच्या प्रयत्नामुळे मंजूर झाले असून या कामांचे श्रेय घेण्याचा पोरकटपणा भाजपचे आमदार करत आहे, अशी टीका सेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.नगरसेवक नाना भानगिरे, नगरसेविका प्राची आल्हाट यांच्या विकासकामांचा शुभारंभ आढळराव यांच्या हस्ते झाला.

यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार महादेव बाबर, उपशहर संघटक विजय देशमुख, उपशहर प्रमुख समीर तुपे, नगरसेविका संगीता ठोसर, शहर संघटक अमोल हरपळे, बाळासाहेब भानगिरे, विभागप्रमुख जयसिंग भानगिरे, अभिमन्यू भानगिरे, आशिष आल्हाट, विभागप्रमुख पोपट आंबेकर, प्रभाग अध्यक्ष शिवा शेवाळे, वैष्णवी घुले, विकास भुजबळ, विशाल वाल्हेकर, नाना तरवडे, अनिल जाधव, योगेश सातव, प्रकाश तरवडे, अंकुश घुले, सोपान लोंढे, लहू शिंदे, सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

आयोजक नगरसेवक नाना भानगिरे यांनी बोलताना यावेळी सांगितले की, कोट्यवधी रुपयांची विकासकामे सेनेने सुरू केलेली आहेत. हांडेवाडी रस्त्याचे रुंदीकरण, फुटबॉल ग्राउंड, रुग्णालय, व्यायामशाळा, जलतरण तलाव, विविध भागांत पाण्याच्या टाक्‍या, भुयारी मार्ग आदी विकासकामांमुळे प्रभाग क्रमांक 26 चा कायापालट होणार आहे. महापालिकेत सत्तेत नसताना सेनेने विरोधकांपेक्षा जास्त विकासकामे करून दाखवली आहेत, त्यामुळे सर्व जनतेने शिवसेनेच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जयसिंग भानगिरे यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)