विकासकांकडून मागविलेल्या निविदांना मुदतवाढ

संग्रहित छायाचित्र

प्रधानमंत्री आवास योजनेला गती देण्यासाठी पीएमआरडीएचा पुढाकार

पुणे: प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्वांसाठी घरे योजनेला अधिक गती देण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) पुढाकार घेतला आहे. शासनाने सार्वजनिक, खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेलनुसार ही योजना राबविण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार पीएमआरडीएने विकासकांकडून परवडणाऱ्या घरांसाठी निविदा मागविल्या आहेत. या निविदांसाठी 10 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

केंद्र शासनाने 2022 पर्यंत देशातील प्रत्येकला हक्‍काचे घर उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजना – सर्वांसाठी घरे ही योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांच्या बांधकामास गती देण्यासाठी तसेच वेळेत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाने पीपीपी तत्वावरील सार्वजनिक जमिनींवर राबवायच्या प्रकल्पांसाठी सहा मॉडेल तर खासगी जमिनीवर राबवायचे दोन मॉडेल जाहीर केले आहेत.

यातील खासगी जागेवर खासगी विकासकांच्या सहभागातून परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे प्राधिकरणाच्या हद्दीत स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देणे शक्‍य होणार आहे. 2022 पर्यंत पुणे जिल्ह्यासाठी 2 लाख 19 हजार 75 घरे बांधणीचे उद्दिष्ट आहे.

खासगी जमिनींवर परवडणाऱ्या घरांसाठी (क्षेत्रफळ 300 ते 600 चौ.मी) अल्प उत्पन्न घट (एलआयजी) व आर्थिक दुर्बल गट (इड्‌ब्लूएस) या घटकांतील घरांसाठी प्राधिकरणाच्या हद्दीत गृहनिर्माण प्रकल्प विकसक पीपीपी तत्वावर ही योजना राबवू शकणार आहे. पीपीपी मॉडेलमुळे स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देणे अधिक सोपे होणार आहे.

घरांसाठी निविदेस मुदतवाढ
पीएमआरडीएच्या क्षेत्रामध्ये पंतप्रधान आवास योजना प्रभावीपणे राबविली जाणार आहे. पीएमआरडीएकडून परवडणाऱ्या घरांसाठी निविदेस मुदतवाढ देण्यात आली आहे. यासाठी इच्छुक विकसक 10 एप्रिल 2018 पर्यंत या निविदेमध्ये सहभागी होऊ शकतील. दरम्यान, परवडणाऱ्या घरांसाठी नागरिकांना प्राधिकरणाकडे अर्ज करता येणार आहे. अर्जदारांपैकी पात्र लाभार्थ्यांना केंद्र व राज्य शासनाचे असे एकूण अडीच लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)