विंग येथे तरुणांसाठी आर्थिक साक्षरता अभियान

शिरवळ- तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये आणि त्यांनी आर्थिक साक्षर व्हावे, यासाठी विंग गावातील तरुणांसाठी ग्राम विकास मंचाच्या माध्यमातून आर्थिक साक्षरता अभियान राबवण्यात आले. विंग येथे ग्रामविकास मंचाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवण्यात येतात. या अभियानांतर्गत तरुण पिढीसाठी नववर्षाच्या मुहुर्ताच्या निमित्ताने आर्थिक नियोजन पटवून देण्यासाठी मनी ऍकॅडमीचे संस्थापक आकाश गोंदवले यांनी तरुणांना मार्गदर्शन केले. यावेळी अनेक तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तरुणांनी आपला पैसा कोणत्याही व्यसनात खर्च करण्यापेक्षा त्याचे योग्य ते नियोजन करावे या मंचाच्या माध्यमातून तरुणांना पटवून देण्यात आले.
ग्रामविकास मंच च्या माध्यमातून गावात स्वच्छता अभियान राबवण्यात येते. याबरोबरच गावातील ग्रामस्थांसाठी वाचनालय स्थापन करण्यात आले आहे. तरुणांसाठी व्यायामशाळा उपलब्ध करून देण्यासाठी मंचाचे मोठे योगदान आहे. तसेच या उपक्रमांसाठी गावातील गोदरेज ऍण्ड बॉईज तसेच सी. जी. फार्मापॅक”मधील तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)