वा रे फडणवीस तेरा खेल…सस्ती दारु महंगा तेल… 

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी 

मुंबई: “वा रे फडणवीस तेरा खेल…सस्ती दारु महंगा तेल’… “फडणवीस सरकार होशमें आओ…घरपोच दारु देणाऱ्या सरकारचा निषेध असो…मागासवर्गीय आयोगाचा अहवाल पहिल्याच दिवशी सभागृहात ठेवा…अशा घोषणा देत हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या व सहयोगी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन छेडले. यावेळी “ठग्ज ऑफ महाराष्ट्र’ असे पोस्टर फडकवून सरकारचा निषेध केला.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळातील पक्षनेते अजित पवार आदींनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या दिला. दुष्काळाची पोकळ घोषणा नको… ठोस उपाय करा, शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत द्या, प्यायला नाही पाणी आणि आश्वासनांची वाणी, मराठा, मुस्लीम धनगर, लिंगायत समाजाला आरक्षण द्या…असे फलक दाखवत विरोधी पक्षांचे आमदार पायऱ्यांवर बसून घोषणाबाजी करीत होते.

तेवढ्यात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पायऱ्यांजवळ येताच विरोधकांनी घोषणांचा सुर अचानक बदलला. ये अंदर की बात है.. खडसे हमारे साथ है…खडसे संघर्ष करो हम तुम्हारे साथ है… अशा घोषणा सुरु करताच खडसे यांच्या चेहऱ्यावरील हसू मावळले. विरोधकांना कसेबसे हस्तांदोलन करीत त्यांनी विधानभवात प्रवेश केला.
त्यानंतर भाजपचेच अनिल गोटे आले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा देण्याची घोषणा त्यांनी केली होती त्याचा धागा पकडत विरोधकांनी पुन्हा एकदा ये अंदर की बात है… अनिल गोटे हमारे साथ है… अशी घोषणाबाजी सुरु केली. भाजपचे मंत्री व आमदारांचा प्रवेश होताच विरोधकांना अधिकच चेव चढत होता. आमदार आशिष शेलार व शिक्षण मंत्री विनोद तावडे येताच विरोधकांनी बघता काय सामिल व्हा अशी घोषणाबाजी केली. बराच वेळ घोषणाबाजी सुरु होती. कामकाज सुरु होण्याची बेल होताच विरोध सभागृहाच्या दिशेने रवाना झाले.
चौकट

दुष्काळाच्या चर्चेची मागणी फेटाळली 
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेचे कामकात सुरु होताच विरोधकांनी दुष्काळावरील चर्चेची मागणी केली. राज्यात दुष्काळी गंभीर संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी दुष्काळावर चर्चा सुरु करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. परंतु, ही मागणी फेटाळण्यात आल्याने शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… अशा घोषणा विरोधी बाकावरून देण्यात आल्या.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)