‘वाह आयसीसी वाह,वेगवेगळे लोक-वेगवेगळे नियम-हरभजन सिंह

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या बॉल टेम्परिंग प्रकरणी टीम इंडियाचा फिरकीपटू हरभजन सिंहने आयसीसीवर नाराजी व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज कॅमेरुन बॅनक्रॉफ्टवर सामन्याच्या मानधनाच्या 75 टक्के रकमेचा दंड आणि बंदी न घातल्यामुळे त्याने आयसीसीच्या निर्णयावर टीका केली.

हरभजन सिंहने 2001 साली खेळवण्यात आलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीतील एका निर्णयाचा दाखला दिला. या कसोटीत भारताचे पाच खेळाडू सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, सौरव गांगुली, शिवसुंदर दास आणि दीपदास गुप्ता यांच्यावर मॅफ रेफरीने विविध आरोप लावत एका कसोटीची बंदी घातली होती. हरभजनने 2008 सालच्या सिडनी कसोटीचाही हवाला दिला. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा खेळाडू अँड्र्यू सायमंडवर कमेंट केल्यामुळे तीन कसोटी सामन्यांसाठी बंदीची कारवाई करण्यात आली होती.

हरभजनने आयसीसीला टॅग करत ट्वीट केले. ”वाह आयसीसी वाह, पुरावे असतानाही बॅनक्रॉफ्टवर कोणतीही कारवाई नाही, तर 2001 साली दक्षिण आफ्रिकेत जोरात अपील केल्यामुळे आम्हा सहा जणांवर कारवाई करण्यात आली होती, कोणत्याही पुराव्यांअभावी 2008 सालच्या सिडनी कसोटीत दोषी सिद्ध न होऊनही तीन कसोटी सामन्यांची बंद घातली होती. वेगवेगळे लोक-वेगवेगळे नियम,” असे हरभजन म्हणाला.

दुसरीकडे इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही आयसीसीच्या निर्णयावर टीका केली. ”स्मिथवर एका सामन्याची बंदी आणि एका सामन्याच्या मानधनाचा दंड. तर बेनक्रॉफ्टवर मानधनाच्या 75 टक्के दंड आणि एक डिमेरट गुण. चांगली शिक्षा देऊन एक उदाहरण निर्माण करण्याची ही वेळ होती. मात्र ही कसली शिक्षा सुनावली,” असा प्रश्न वॉनने उपस्थित केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)