नवी दिल्ली: मारुती सुझुकीने कारचालकांसाठी मोटारसायकल आधारित रस्त्यांवर उपयोगात पडणारी सेवा सुरू केली. 350 सुझुकी बाईकच्या साहाय्याने 251 शहरांत सेवा पुरविण्यात येत आहे. दोन वर्षात ही सेवा 500 शहरांपर्यंत वाढविण्याचा प्रयत्न आहे. देशात अनेक ठिकाणी वर्दळ जास्त असल्याने अशावेळी कार आधारित सेवेला विलंब लागतो. अशावेळी ग्राहकांना वेळेवर सेवा मिळत नाही. यावर उपाय म्हणून तत्काळ सेवा देण्यासाठी आणि आवश्‍यक उपकरणांच्या साहाय्याने दुचाकीच्या मदतीने सेवा देण्यात येणार आहे, असे कंपनीचे सीईओ केनिची आयुकावा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)