वाहन चालकांना लुटणाऱ्यांना अटक

मंचर- पुणे-नाशिक रस्त्यावर कळंब गावानजीक 25 दिवसांपूर्वी वाहन चालकांना लुटणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी अटक केली आहे.
अटक केलेल्या व्यक्तींचे नाव अमित देविदास शेटे (वय 26, रा. गव्हाणेमळा नारायणगाव), चंद्रकांत मारूती नवले (वय 37 रा. कुरण ता. जुन्नर) आहे. कुंदन अशोक नानोटे (रा. औध पुणे) हे 17 जुर्ले रोजी दुपारी सुमारे 1 वाजता टोयटो कारमधून भंडारदरा डॅम येथे फिरायला गेले होते. यावेळी त्यांच्या सोबत लहान भाऊ चंदन नानोटे, मित्र परितोष चंद्रकापुरे, रूचित जैन होते. रात्रीच्या वेळी माघारी आळेफाटा मार्गे मंचरच्या दिशेने येत असताना नारायणगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ पाठीमागुन मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात तरूणांनी कार थांबवण्यासाठी इशारा केला.
त्यातील एकाच्या हातात दगड होता. त्यामुळे कुंदन नानोटे यांना संशय आल्याने त्यांनी कार न थांबविता तशीच पुढे जोरात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु, समोर मालवाहतूक टेम्पो असल्यामुळे कारपुढे जाउ शकली नाही. त्यामुळे आरोपीने दगड मारल्याने कारचे नुकसान झाले. अखेर तरूणांनी कारला मोटारसायकल आडवी मारून कार थांबविण्यास भाग पाडले. त्यावेळी मोटारसायकलवरील दोन तरूणांनी दम देवुन पैशांची मागणी केली. तसेच पैसे दिले नाही तर खेड ते नारायणगाव दरम्यान आमची मुले थांबली आहेत. तुम्हाला सोडणार नाही, असे सांगत कारमधील सर्वांना मारहाण करीत बळजबरीने त्यांच्याकडील 9 हजार 800 रूपये घेतले.
या संदर्भात मंचर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात तरूणांच्या विरोधात मारहाण करून बळजबरीने पैसे घेतल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, एस. पी. जावळे, डी. डी. साबळे यांच्या पथकाने अमित शेटे, चंद्रकांत नवले यांना अटक करून मंचर पोलिसांच्या ताब्यात दिले.पुढील तपास मंचर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अर्जुन शिंदे करीत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)