वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी

वरवंड- 29 व्या राष्ट्रीय सडक सुरक्षा अभियानाची सुरुवात पाटस टोल प्लाझा या ठिकाणी बारामती फाटा महामार्ग पोलीस केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने आणि पुणे-सोलापूर एक्‍स्प्रेस-वे प्रा. लि. चे वरिष्ठ अधिकारी एस. के. घोष, पवनकुमार सिंग यांच्या हस्ते करण्यात आली. याअंतर्गत महामार्गावर वाहन चालकांची मोफत नेत्र तपासणी दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे नेत्र चिकित्सक डॉ. शेंडकर यांनी केले आणि या चालकांना डोळ्याच्या देखभाली संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी 53 व्यक्तींची नेत्र तपासणी करण्यात आली. याबरोबरच महामार्गावरील वाहनचालकांना वाहतुकीच्या नियमावलीची माहिती पुस्तक व पत्रिका वाटण्यात आली. यावेळी सहाय्यक निरीक्षक सुनील माने यांनी वाहतुकीसंदर्भात वाहन चालकांना मार्गदर्शन करून नियम पाळण्यासाठी सूचना दिल्या.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सतत वाहतूक सुरळीत व्हावी, याकरिता 24 तास पेट्रोलिंग वाहन गस्त घालत असते,त्यामुळे महामार्गावर काहीही अडचण निर्माण झाल्यास महामार्गाच्या हेल्पलाइन टोल फ्री नं 18002331977 आणि आपत्कालीन क्र. 8554996919-20, तसेच केंद्र सरकारच्या महामार्ग आपत्कालीन क्र. 1033 वर संपर्क साधण्याचे आवहान महामार्ग प्रशासनातर्फे करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)