वाहन क्षेत्रातही लवकरच धावणार ‘मेड इन चायना’

नवी दिल्ली : एसएआयसी मोटार ही चिनी कंपनी लवकरच भारतीय बाजारपेठेत आपले मॉडेल सादर करणार आहे. कंपनी मॉरिस गॅरेजेस या ब्रॅन्ड नावाने २०१९ मध्ये उतरणार असून २०२५ पर्यंत ५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

कंपनीने यापूर्वी गुजरातमधील हलोल प्रकल्प खरेदी केला असून त्याची क्षमता दरवर्षी ८० हजार ते १ लाख वाहने इतकी आहे. या प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी कंपनीकडून गुंतवणूक करण्यात येईल. याचप्रमाणे बाजारपेठेत आपला हिस्सा मजबूत करण्याचाही प्रयत्न असणार आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत कंपनीकडून १ हजार कर्मचार्‍यांची भरती करण्यात येईल.

दरम्यान, स्मार्टफोन बाजारात स्वस्त मोबाइल दिल्यानंतर आता चिनी कंपन्या भारतातील वाहन क्षेत्रात उतरणार असल्याने भारतीय वाहन उद्योगात स्पर्धा वाढणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)