वाहनाच्या धडकेने पादचारी ठार

भोसरी – अज्ञात वाहनाची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली.

शेरबहादूर काशीराम भंडारी (वय 57) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. निष्काळजीपणे वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

-Ads-

शेरबहादूर भंडारी भोसरी एमआयडीसीतून पायी जात होते. त्या वेळी पाठीमागून आलेल्या मोटारीची (एमएच 14, इपी 7149) त्यांना जोरात धडक बसली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मृत शेरबहादूर यांचे नातेवाईक असलेल्या नमन उदयसिंग बिस्टा (रा. इंद्रायणीनगर, भोसरी, मूळचा रा. नेपाळ) यांनी फिर्याद दिली आहे. भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)