पुनावळे – रस्ता ओलांडत असताना भरधाव वाहनाची धडक बसून एक जण मृत्युमुखी पडला. ही घटना देहूरोड – कात्रज बाह्यवळण महामार्गावर पुनावळे येथे घडली.
बिहारीलाल गणेश केवट (वय-38, रा. छत्तीसगड) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी मनोजकुमार निसार (वय-22, रा. पुनावळे) यांनी फिर्याद दिली आहे.
बिहारीलाल आणि मनोजकुमार हे एकाच गावचे आहेत. 20 एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास दोघे पुनावळे येथे सुझुकी सर्व्हिस सेंटरजवळ गेले होते. यावेळी भरधाव वाहनाची बिहारीलाल यांना जोरदार धडक बसली. यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. फौजदार डी. एन. निकम तपास करत आहेत.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा
What is your reaction?
0
0
0
0
0
0
0