वाहनाच्या धडकेत पादचारी ठार

भुईंज, दि. 13 (प्रतिनिधी) – आसले गावच्या हद्दीत भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी जागीच ठार झाला.
सातारा-पुणे महामार्गावरील शुक्रवारी पहाटे आसले गावच्या हद्दीत भरघाव वाहनाने पादचारी युवकाला पाठीमागून जोराची धडक दिली. धडक एवढी जोरात होती की युवक जागीच ठार झाला. अपघाताची नोंद भुईंज पोलिस ठाण्यात झाली आहे. मृताची ओळख पटली नसून धडक देवून पसार झालेल्या वाहनाचा पोलिस शोध घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)