पिंपरी – आकुर्डी येथे एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी मयत तरुणाचा भाऊ अशोक बारीकराव चौधरी (वय-36, रा. शिक्रापूर, पुणे) यांनी निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौधरी यांचा भाऊ जितेंद्र चौधरी हा त्याचा मित्र उस्मान बादशाह बागवान याच्या सोबत दुचाकीवरुन बिजलीनगर येथून गुरुद्वाराच्या दिशेने जात असताना अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिली. यामुळे चौधरी यांची गाडी तेथील एका सुरक्षा भिंतीला जाऊन धडकली. यामध्ये जितेंद्र याच्या डोक्‍याला गंभीर जखम झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)