पिंपरी – रस्ता ओलांडत असलेल्या तरुणाला एका वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 11) सायंकाळी सहाच्या सुमारास बालेवाडी गेट, हिंजवडी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश कुमार तिवारी (वय-20, रा. वास्तू विहार, भूमकर चौक, हिंजवडी) असे अपघातात मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

या प्रकरणी मुमताज मनसुरी (वय-20, रा. भूमकर चौक, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. रुपेश सायंकाळी सहाच्या सुमारास मुंबई-बेंगलोर महामार्गावर बालेवाडी गेटसमोर रस्ता ओलांडत असताना एका भरधाव वेगातील वाहनाने त्याला धडक दिली. यात रुपेशचा मृत्यू झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)