वाहनाच्या धडकेत अज्ञात महिलेचा मृत्यू

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील पेठ येथे बुधवारी (दि. 9) रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एका अनोळखी महिलेचा मृत्यू झाला.
पुणे-नाशिक रस्त्यावरील पेठ गावानजीक हॉटेल चंद्रनील आहे. तेथील हॉटेलचे मालक भगवान कोंडिभाऊ धुमाळ यांना हमरस्त्यावर आरडाओरडा झाल्याचा आवाज आल्याने त्यांनी रस्त्याकडे धाव घेतली. त्यावेळी 45 वर्षांची अनोळखी महिला रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली. अज्ञात वाहनाने धडक देऊन तिच्या चेहऱ्यावरून चाक गेल्याने चेहऱ्याचा चेंदामेंदा झालेला होता. त्यामुळे तिची ओळख पटविणे कठिण झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संजय गिलबिले यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)