वाहनांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

स्वच्छ इंधनाचा जास्तीत जास्त वापर होण्याची गरज

मुंबई: 2020 पर्यंत भारतातील सर्व वाहने 100 टक्‍के सुरक्षित होतील. भारतीय वाहनांमधील सुरक्षेसंबंधीचे तंत्रज्ञान प्रगत देशांमधील तंत्रज्ञानाइतकेच सक्षम व तुल्यबळ असेल, अशी ग्वाही महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पवन गोएंका यांनी दिली.

इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंग सोसायटीची (फिसिता) आंतरराष्ट्रीय परिषद ऑक्‍टोबर महिन्यात पहिल्यांदाच भारतात चेन्नईत होत आहे. यासंबंधी डॉ. गोएंका यांनी सांगितले की, अनेक विदेशी कंपन्या भारतीय ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगमध्ये गुंतवणूक करण्यास तयार आहेत. पण तंत्रज्ञानात ते गुंतवणूक करीत नाहीत. भारतीय तंत्रज्ञानावर त्यांचा अद्याप विश्‍वास नाही, हे वास्तव आहे. त्यामुळेच भारतीय तंत्रज्ञानही सरस आहे, हे या परिषदेद्वारे जगाला दाखवून दिले जाणार आहे. सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स इंडिया (एसईआय इंडिया) या परिषदेची आयोजक आहे.

इलेक्‍ट्रिक वाहनांसाठी अत्यावश्‍यक असलेली लिथियम बॅटरीची समस्या पुढील आठ ते दहा वर्षांत सुटेल. जगभरात लिथियमचा साठा मुबलक आहे. त्या तुलनेत सध्या मागणी अत्यल्प आहे. त्यामुळे भारताने आतापासून प्रयत्न सुरू केल्यास, येत्या काही वर्षांत या बॅटरी सहज उपलब्ध होतील, असे डॉ. गोएंका यांनी या वेळी सांगितले.

केंद्र सरकारने केवळ कारसाठी नाही तर दुचाकी व्यावसायिक वाहनासाठीचे इंधनाचे नियम आणि कालमर्यादा कडक केल्या आहेत. त्यामुळे या वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी नवे तंत्रज्ञान वापरण्यासाठी भांडवली गुंतवणूक करणे सुरू केले आहे. यामुळे लवकरच भारतातील वाहनांची सुरक्षितता आणि कार्यक्षमता विकसित देशांच्या तोडीची असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)