वाहनांची यांत्रीक तपासणी

पुणे,दि.29(प्रतिनिधी)-पुणे शहर व जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी गणेश विसर्जन मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या ट्रक, ट्रॅक्‍टर, ट्रेलर तसेच इतर हलक्‍या व जड वाहनांची यांत्रीक तपासणी करण्यासाठी दिनांक 30 ऑगस्ट ते पाच डिसेंबर या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे. पुणे शहरातील वाहनांसाठी आरटीओचे आळंदी रस्त्यावरील चाचणी मैदान व पिंपरी-चिंचवड शहरातील वाहनांसाठी आरटीओच्या मोशी येथील कार्यालयात तपासणी करण्यात येणार आहे.
सर्व गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणूकीत सामील होणाऱ्या वाहनांची यांत्रीक तपासणी करुन व त्याची वाहने यांत्रीकदुष्ट्या सुस्थितीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे असे आवाहन आरटीओतर्फे करण्यात आले आहे.
वाहनचालकांसाठी सूचना
* वाहनांची सर्व कागदपत्रे व लायन्सन मुदतीत असल्याची खात्री करा
* चालकाने वाहन दुसऱ्याच्या ताब्यात देऊ नये
* वाहन एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबणार असेल तर हॅण्डब्रेकचा वापर करावा
* वाहनाच्या इंधनाच्या टाकीचे झाकण हे धातूचेच असाव्रे
* चालकाच्या केबीनमध्ये कोणतीही ज्वलनशील वस्तू ठेऊ नये
* चालकास अडथळा होईल अशा पध्दतीने कोणत्याची व्यक्तीस बसवू नये
* वाहन स्थिर स्थितीत असताना इंजिन बंद करावे
* अनावश्‍यक हॉर्नचा वापर टाळावा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)