पुणे- दहशत माजविण्यासाठी दारूच्या नशेमध्ये गणेशखिंड परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोघांना अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एच. आर. जाधव यांनी त्यांना 22 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे. अक्षय अर्जुन अडागळे (वय 21), प्रतिक सुनील कदम (वय 19, दोघेही रा. गणेशखिंड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अमीर उल्लाऊद्दीन शेख (वय 20, रा. गणेशखिंड) याच्यावर गुन्हा दाखल आहे. याबाबत संजय शंकर क्षीरसागर (वय 34, रा. गणेशखिंड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना दि. 19 ऑगस्ट रोजी रात्री दोन वाजता गणेशखिंड येथील कस्तुरबा वसाहत येथे घडली. अडागळे, कदम आणि शेख यांनी दारूच्या नशेमध्ये कस्तुरबा वसाहत येथे दांडके आणि दगड घेवून आरडाओरडा केली. त्यावेळी वसाहतीतील दोन रिक्षा, टॅम्पो, एका चारचाकीची, पाच दुचाकींची आणि एका हातगाडीचे नुकसान केले. तसेच घरांच्या दरवाज्यावर दांडके मारून दहशत माजवीली, असे फियार्दीमध्ये नमूद करण्यात आले आहे. आरोपींचे कोणी साथीदार आहे का? याचा शोध घेण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील चैत्राली पणशीकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)