पुणे : वाहनांची तोडफोड करून तरुणावर कोयत्याने वार

पुणे – रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करून एका तरुणावर कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना रविवारी रात्री महर्षीनगर येथील लाल चाळीत घडली.फिर्यादी ओमकार धुमाळ (18, रा. महर्षीनगर) हा त्याच्या घराशेजारी असणाऱ्या दुर्गा मंदिराजवळ उभा असताना त्याच्या ओळखीचे अभिषेक लोंढे, उदयनाथ व त्याचे सात ते आठ साथीदार तेथे दाखल झाले. दुचाकीवरून आलेल्या या व्यक्तींच्या हातात तलवारी, कोयते, बांबु आणि लोखंडी गज होते. त्यांनी तेथे रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करून फिर्यादींच्या घरावर दगडफेक केली. त्यानंतर फिर्यादीवर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी फिर्यादींची बहीण तेथे आली असता तिलाही जीवे मारण्याचा प्रयत्न करून धमकी देण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक ए. बी. भोसले तपास करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)