वाहनधारकांच्या डोकेदुखीत आणखी वाढ

ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे आणखी एका मार्गावरील वाहतूक वळवली

सातारा – येथील पोवईनाक्‍यावर सुरू असलेल्या ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे यापुर्वीच अनेक मार्गावरील वाहतूक वळविल्यानंतर आता पंचायत समितीकडून हॉटेल दर्यामार्गे पोवई नाक्‍याकडे जाणाऱ्या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे. यामुळे वाहनधारक अधिक त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर ग्रेड सेप्रेटरचे काम पुर्ण करून वाहनधारकांना दिलासा देण्याची मागणीदेखील होवू लागली आहे.

-Ads-

पंचायत समितीकडून पोवईनाक्‍याकडे जाणाऱ्या चौकात वाहतूक कोंडी होवू लागल्यामुळे मंगळवारी दुपारपासून बॅरेगेटस लावून वाहतूक वळविण्यात आली आहे. पंचायत समितीकडून येणाऱ्या वाहनधारकांना आता डाव्या दिशेने यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजकडे जावून व तेथून टर्न मारून हॉटेल दर्यामार्गे पोवईनाक्‍याकडे जावे लागत आहे. यामुळे परिसरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होत असली तरी वाहनधारकांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे.

त्याच बरोबर यशवंतराव चव्हाण सायन्स कॉलेजच्या मार्गावरून दुचाकी आणि चारचाकी एकाच वेळी वळविण्यात येत असल्यामुळे त्या ठिकाणी आता वाहतूक कोंडी होत आहे आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी सर्व वाहने त्या ठिकाणावरून न वळवता कॉलेजच्या पहिल्या टप्प्यावर दुचाकी व पुढे जावून दुसऱ्या टप्प्यावर चारचाकी वाहने वळविणे आवश्‍यक आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)