वाहनधारकांचे टोल चुकविणे स्थानिकांच्या जीवावर

पाडेगाव ः टोलनाक्यावर बुधवारी मध्यरात्री ट्रकचा झालेला अपघात.

लोणंद, दि. 6 (प्रतिनिधी) – महामार्गावर भरमसाठ टोल भरावा लागत असल्याने अनेक वाहने टोल चुकविण्यासाठी सातारा-नगर या रस्त्याचा वापर करत आहेत. मात्र, या रस्त्याची रुंदी कमी असल्याने तसेच रस्त्याच्या दुतर्फा लोकवस्ती असल्यामुळे वाहनधारकांचे टोल वाचविणे स्थानिकांच्या जीवावर बेताणार ठरत आहेत हे बुधवारी रात्री झालेल्या पाडेगाव येथील अपघातामुळे स्पष्ट झाले आहे.
सातारा-नगर या मार्गावर वाढे, शिवथर, देऊर, लोणंद, पाडेगाव यासह इतरही अधिक लोकवस्तीचे गावे येतात. या मार्गाची रुंदी ही कमी आहे. तसेच या रस्त्याची अवस्थाही फारशी चागली नाही. खड्ड्यांमुळे या रस्त्याची आधीच दुरुवस्था झालेली असताना अवजड वाहतुकीमुळे रस्त्याच्या दुरवस्थेत आणखीनच भर पडत आहेत. या मार्गावर शाळा, महाविद्यालयेदेखील आहेत. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. दरम्यान, महामार्गावरुन प्रवास करताना अनेक ठिकाणी टोल भरावा लागतो. विशेषत: अवजड वाहनांना भरमसाठ टोल आकारला जात असल्याने अनेक वाहनधारक सातारा-नगर या मार्गाचा वापर करत आहेत. या मार्गावर टोलनाके नसल्यामुळे दिवसेदिवस या रस्त्यावरुन वाहनांची संख्या वाढत आहे. विशेषत: अवजड वाहने या मार्गाचा अधिक प्रमाणात वापर करु लागले आहेत. रस्त्याच्या रुंदीमुळे आणि वाहनांची संख्या वाढल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा ताण येत आहे. तसेच या रस्त्यावरील अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. नुकताच सातारा नगर मार्गावरील पाडेगाव हद्दीत असलेल्या टोलनाक्‍यावर एका ट्रकचा भीषण अपघात झाला. हा अपघात ब्रेकफेल झाल्याने झाला असून ट्रकने टोलनाक्‍याचे बुथच उडविले आहे. याशिवाय टोलनाक्‍याचे शेडदेखील या अपघातात मोडले आहे. अपघातामुळे वाहतुकीचाही खोळंबा झाला. सुदैवाने टोल बंद झालेला आहे. तसेच अपघात रात्रीच्या वेळी घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे हा परिसर दिवस मोठ्या प्रमाणात गजबजेला असतो. परिसरात सातारा जिल्ह्यातील मोठी आश्रमशाळा तसेच लग्नसमारंभाचे कार्यालय आहे. शिवाय छोटे-मोठे व्यावसायिक तसेच हॉटेल व्यवसायही परिसरात चांगल्या प्रमाणात चालतो. त्यामुळे याठिकाणी नागरिकांची नेहमीच वर्दळ असते. हा अपघात जर दिवसा घडला असता तर या ठिकाणी मोठा दुर्घटना घडण्याची शक्‍यताही नाकारता येत नव्हती. एकंदरीत वाहनधारकांकडून चार पैसे वाचविण्यासाठी होत असलेला केविलवाणा प्रकार हा अनेकांच्या जीवावर उठू शकतो हे या घटनेतून समोर आले आहे.

अनेक ट्रकचालक महामार्गावरील टोल चुकवण्यासाठी सातारा नगर रस्त्याचा वापर करत असतात. त्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीचा ताण येत आहे. लोणंदच्या वाहतूक कोंडीला काही अंशी या रस्त्यावरील वाहतूकसुद्धा जबाबदार आहे. यामुळे लोणंदला तातडीने बाह्यवळन मार्गाची उभारणी करणे आवश्‍यक आहे.
विशाल जाधव. लोणंद


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)