वाहतूक बदलाबाबत हरकती, सूचना पाठवा

file photo..

पिंपरी – सुरळीत वाहतुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. याबाबत पोलिसांनी नागरिकांकडून 8 ऑक्‍टोबरपर्यंत हरकती व सूचना मागविल्या आहेत.

वाकी (चाकण) ते वाकड गाव चौक दरम्यानच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेश बंद असणार आहे. तसेच जुना मुंबई-पुणे रोडवरील सेंट्रल चौक (देहूरोड) ते हॅरीस ब्रीज, दापोडी सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत, भूमकर चौक ते महावीर चौक दरम्यानच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना सकाळी सात ते दुपारी एक आणि सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत, देहूगाव ते आळंदी दरम्यानच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेश बंद आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मानकर चौक ते आळंदी रोड दरम्यानच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत, तळेगाव ते चाकण दरम्यानच्या रस्त्यावर सकाळी सात ते सायंकाळी सात, रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना पार्किंग व हॉल्टिंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. औंध ब्रीज ते वाकड ब्रीज दरम्यानच्या रस्त्यावर सर्व प्रकारच्या जड व अवजड वाहनांना सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत आणि सायंकाळी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे.

पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरी राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील दोन्ही सेवा रस्त्यांवर खासगी लक्‍झरी बस, कंपनी बसेस व जड वाहतुकीस सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत मनाई आहे. भोसरी चौकातून दिघी मॅगझीन चौकाकडे व दिघी मॅगझीन चौकाकडून भोसरी चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांना सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रवेश बंद आहे. भोसरी वाहतूक विभाग पिंपरी चिंचवड अंतर्गत दापोडी चौक ते आंबेडकर चौक (दापोडी गाव) पर्यंत सांगवी, पिंपळे गुरव रस्त्याकडे जाणाऱ्या मार्गावर जाणे-येणे साठी सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)