वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी

सांगवी – सतत वाहनांची वर्दळ असलेल्या स्पायसर स्कूल ते साई समर्थ पेट्रोलपंप दरम्यान वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे. मात्र, या रस्त्यावर वाहतूक नियमन करण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात नसल्याने वाहन चालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.

माजी नगरसेवक अतुल शितोळे यांनी यासंदर्भात त्यांनी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांना निवेदन दिले आहे. स्पायसर स्कूल ते साई समर्थ पेट्रोलपंप हा रस्ता पिंपरी महापालिका आणि पुणे महापालिकेला जोडणारा दुवा आहे. सांगवी, दापोडी, पिंपळे-गुरव, पिंपळे-सौदागर या भागातील नागरिकांना पुण्यात जाण्या-येण्यासाठी या रस्त्याचा उपयोग होतो. त्यामुळे या रस्त्यावर सतत रहदारी असते.

स्पायसर स्कुलच्या बस रस्त्यातच उभ्या केलेल्या असतात. त्यामुळे या चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झाली आहे. वाहनांची वर्दळ असताना आणि वाहतूक कोंडी होत असताना या ठिकाणी वाहतूक पोलीस तैनात नसतात. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांची नितांत आवश्‍यकता असल्याचे शितोळे यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)