वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्याला शिक्षा

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी)
रिक्षा चालकासोबत वाद घालत असलेल्या युवकाला समजावुन सांगणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण करणाऱ्या एका युवकाला सत्र न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
सन 2017 मध्ये सातारा शहरातील पोवई नाक्‍यावर पुढे जाण्यास रस्ता दिला नाही म्हणून एका रिक्षा चालकासोबत वाद घालुन वाहतुकीला अडथळा करताना समजावून सांगण्यासाठी गेलेल्या वाहतुक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी आकाश वासू चव्हाण रा. लक्ष्मीटेकडी, सदरबझार, सातारा याला साताऱ्यातील दुसरे अतिरीक्त सत्र न्यायाधिश एन.डी,खोसे यांनी एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, 16 आक्‍टोंबर 2017 रोजी पोवई नाक्‍यावर आकाश हा पुढे जायला रस्ता दिला नाही म्हणून एका रिक्षा चालकासोबत वाद घालुन वाहतुकीला अडथळा निर्माण केला होता. दरम्यान पोवई नाक्‍यावर वाहतूक नियमन करण्यासाठी असलेल्या पोलिस हवालदार सुनिल जाधव यांनी आकाश यास वाद करून रस्त्यावर वाहतूक कोंडी न करण्याचे सांगताच आरोपीने त्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. त्यानंतर जाधव यांनी उपचाराअंती सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. दाखल तक्रारीचा तपास करून पो.हवा. आर.एस.जाधव यांनी आरोपीच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. या गुन्ह्यात सरकारी वकील ए.पी.कदम यांनी केलेला युक्तीवाद व तपासलेल्या 7 साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानत न्यायमुर्ती एन.डी,खोसे यांनी पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी एक वर्षाची व शासकीय कामात अडथळा आणला म्हणून एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. याकामी पोलिस उप.निरीक्षक पी.के.कबुले, हवा. शमशुद्दीन शेख, अविनाश पवार,सुनिल सावंत, कांचन बेद्रे, नंदा झांझूर्णे, अजित शिंदे, विद्या कुंभार, वैभव पवार, क्रांती निकम यांनी सहकार्य केले .

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)