वाहतूक पोलिसांना एसपींनी दिले शिस्तीचे धडे

ड्युटीवर असताना चहाच्या टपरीवर जाण्यास मज्जाव; लोकांशी सौजन्याने वागण्याचा सल्ला

सातारा – खाकी वर्दीऐवजी पांढरा फूल शर्ट, खाकी पॅंन्ट असा गणवेश करून शिट्टी मारली की, झाला वाहतूक शाखेचा पोलिस असे वाटणाऱ्या वाहतूक पोलिसांना जिल्हा पोलिस प्रमुखांनी शिस्तीचे धडे दिले आहेत. वाहतूक पोलिस म्हणजे फक्त गाड्या अडवणार, हे चित्र बदलण्याचा प्रयत्न होत आहे.लोकांच्या गाड्या आडवताना त्यांच्याशी सौजन्याने वागण्याचा सल्ला देत वाहनधारक दंड भरणार नसेल तर न्यायालयात दावा दाखल करा. मात्र लोकांशी हुज्जत न घालण्याचेही कर्मचाऱ्यांना सूचित केले आहे.

सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेला 59 पोलिस कार्यरत आहेत. त्यामध्ये तीन महिला कॉन्स्टेबल आहेत. एक सहाय्यक पोलिस निरीक्षक शहर वाहतूक शाखेचा डोलारा सांभाळत आहेत. अन्य पोलिस ठाण्यातून शहर वाहतूक शाखेकडे बदली झाली की झाला ट्रॅफिक पोलिस असे चित्र यापुर्वी होते. हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी रितसर वाहतूक नियोजन व कायद्याचे प्रशिक्षण घेतले आहे. मात्र पंकज देशमुख यांनी सातारा पोलिस दलाची सुत्रे हाती घेतल्यानंतर वाहतूक शाखेच्या नव्वद टक्के पोलिसांना मुंबईतील भायखळा येथे प्रशिक्षण घेण्यास पाठवले. त्यानंतरही पारंपारिक पध्दतीने वाहतूक नियमन होत असल्याचे एसपींच्या लक्षात आल्याने त्यांनी वाहतूक पोलिसांसाठी नियमावली बनवली आहे.

वाहतूक नियमन करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याने ड्युटीवर असताना चहा,पानटपरीवर जावू नये. तसेच लोकांशी अनावश्‍यक गप्पा मारू नये, मोबाईलचा वापर गरजेपेक्षा जास्त करून नये. गणवेश निटनेटका असावा. लोकांशी सौजन्याने वर्तन करा, संख्यात्मक काम करण्यापेक्षा गुणात्मक काम करण्याचेही आदेशात नमुद केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)