वाहतूक पोलिसांकडून साईभक्‍तांची दोन तास अडवणूक

मोबाइलवर चित्रीकरण केल्याचा राग ः पोलीस कर्मचारी- कार्यकर्त्यात वाद
शिर्डी – वाहतूक पोलीस वाहन तपासत असताना मोबाइलवर चित्रीकरण केल्याच्या कारणातून पोलिसांनी साईभक्‍तांना दोन तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले. हा प्रकार मंगळवारी घडला.
जामखेड येथील भाविक मंगळवारी (दि. 26) दर्शनासाठी शिर्डीत इनोव्हातून (क्रमांक एम. एच. 04 . ईडी. 9572) आले होते. महामार्गावर ऩेमणुकीस असलेले वाहतूक पोलीस कर्मचारी राहुल सारबते यांनी हे वाहन अडवले. त्यांनी चालकाकडे कागदपत्रे मागितली. परंतु चालकाकडे काही कागदपत्रे नव्हती. यामुळे सारबते यांनी दोनशे रुपयांचा दंड आकारला. याच दरम्यान वाहनात बसलेल्या एका भाविकाने याचे मोबाइलवर चित्रीकरण केले. वाहतूक पोलिसांनी वाहनातील भाविकांना चित्रीकरण डिलीट करण्यास सांगितले. यानंतर पोलिसांनी रागातच संबंधित वाहन शिर्डी वाहतूक शाखेत आणले. त्यानंतर वरिष्ठांचे नाव करत हे वाहन तब्बल दोन तास पोलीस ठाण्यासमोर उभे करुन ठेवण्यात आले.
साई भक्‍तांनी शिर्डीतील भाजपचे कार्यकर्ते रवींद्र गोंदकर यांना संपर्क करुन आपल्यावर बेतलेला प्रसंग सांगितला. गोंदकर यांनी पोलीस ठाण्यात येत संबंधित कर्मचाऱ्याकडे जाब विचारण्याचा प्रयत्न केला. यातून पोलीस कर्मचारी आणि गोंदकर यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक उडाली. आम्ही आमचे काम करत होतो, संबंधित वाहनचालकाला कायदेशीर पावती दिली. त्यांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण केले हे चुकीचे आहे, असे वाहतूक पोलीस सारबते यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)