वाहतूक नियम मोडणारे ‘बाराच्या भावात’

92 जणांच्या पासपोर्टला अटकाव : चरित्र पडताळणी प्रमाणपत्रही कठीण

पुणे – वाहतुकीच्या नियमांचा भंग केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या वाहनचालकांवर दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती पासपोर्ट कार्यालयाला देण्याची कारवाई वाहतूक पोलिसांनी सुरू केली आहे. वाहतूक नियमभंगाचे गुन्हे दाखल असलेल्यांपैकी 92 जणांनी पासपोर्टसाठी अर्ज केले होते. मात्र, वाहतूक पोलिसांनी त्यांच्यावरील प्रकरणांची माहिती दिल्याने पासपोर्ट कार्यालयाने त्यांना पासपोर्ट देण्यास अटकाव घातला आहे.

वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते यांनी बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतले आहे. नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येते.अशा वाहनचालकांनी दंडाची रक्कम ऑनलाइन पद्धतीने जमा करावी लागते. याबाबत त्यांना मोबाइलवर संदेश पाठविण्यात येतो. काहीजण वाहतूक नियमभंगाच्या दंडाची रक्कम भरत नाहीत. दंड भरण्यास टाळाटाळ करतात. अशा वाहनचालकांची माहिती पासपोर्ट, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलिसांच्या चारित्र्यपडताळणी विभागाला देण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक पोलीस उपायुक्त सातपुते यांनी दिला होता. जे वाहनचालक दंड भरत नाही, तसेच टाळाटाळ करतात. अशांनी पुण्यातील पासपोर्ट कार्यालयात पासपोर्ट मिळवण्यासाठी अर्ज केला होता.

पासपोर्ट कार्यालयात अर्ज आल्यानंतर अशी प्रकरणे पोलिसांकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली होती. वाहतूक पोलिसांनी नियमभंग केल्यानंतर दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या 92 जणांची यादी तातडीने त्या कार्यालयाकडे पाठविली. त्यानुसार त्यांच्या पासपोर्टला अटकाव घालण्यात आला आहे.

दखलपात्र, मोटार वाहन कायद्याअंतर्गत दाखल गुन्हा दाखल झाल्यास एखाद्या व्यक्तीने पासपोर्ट मिळवण्याबाबत अर्ज सादर केल्यास त्याबाबतची विचारणा पासपोर्ट कार्यालयाकडून पोलिसांकडे होते. पोलिसांकडून पडताळणी केल्यानंतर (व्हेरिफिकेशन) याबाबतचा अहवाल त्या कार्यालयाकडे पाठविण्यास येतो. गुन्हा दाखल झाल्यास पासपोर्ट मिळत नाही.

वाहतुकीच्या नियमांचे शक्‍यतो पालन करावे. नियमभंग करणे हे फक्त दंडाच्या रक्कमेपुरते मर्यादित राहिले नाही. ज्यांच्या वाहतुकीच्या नियमभंगाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी तातडीने दंडाची रक्कम भरावी. अन्यथा त्यांना भविष्यात पासपोर्ट तसेच चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येणार आहे. वाहतूक ई-चलन प्रलंबित आहे, की नाही हे पाहण्यासाठी पुणेट्रॅफिककॉप. नेट या संकेतस्थळावर खात्री करावी.
– तेजस्वी सातपुते, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)