वाहतूक नियमांचे पालन करावे

उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांचे आवाहन

वडूज – अपघात घडू नये यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्‍यक असून सर्वांनीच हे नियम पाळावेत असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे यांनी केले. येथील हुतात्मा परशुराम ज्युनिअर कॉलेजमध्ये झालेल्या रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हा अधिकारी कार्यालय सातारा व वडूज पोलीस स्टेशन यांच्यावतीने हा कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी वडूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश शेलार, वाहतूक पोलीस नितीन निकम, निर्भया पथकातील महिला पोलीस नीलम रासकर, नितीन सजगणे, अमोल जगदाळे, चंदनशिवे आदींची उपस्थिती होती.
माहिती अधिकारी प्रा. राजेंद्र गोडसे यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमाविषयी मार्गदर्शन केले. प्रा. डी. पी. कुंभार, प्रा. संदीप तिवाटने, प्रा. राजेंद्र जगदाळे, पी. एस. कुलकर्णी, आर. आर. बडवे, ए. व्ही. शेटे, एन. एस. मगर, आर. बी. येलमर, व्ही. व्ही. शेळके, जे. एम. पाटील, पंडित, कुलकर्णी, डोबे आदीसह विद्यार्थी, विद्याथीनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. डी. बागल यांनी तर आभार एस. बी.जाधव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)