वाहतूक नियमभंग करणे पडणार बाराच्या भावात

3 महिन्यांसाठी परवाना रद्द करण्याचे आदेश

पुणे – गाडी चालवताना मोबाइल वापरणे, दारू पिऊन वाहन चालवण्याबरोबरच सिग्नल तोडणेही आता महाग पडणार असून संबंधित वाहनचालकांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येणार आहे. राज्यशासनाने यासंदर्भाचे परिपत्रक काढले असून अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून होणाऱ्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे. यासंदर्भात रस्ता सुरक्षा समितीची नुकतीच नवी दिल्ली येथे आढावा बैठक पार पडली. यात अपघातांमधील जखमी व मृत्युंचे प्रमाण वाढले असल्याने त्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे शासन निर्णयानुसार विविध वाहतुकींचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांचा परवाना निलंबित करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. अपर पोलीस महासंचालकांच्या कार्यालयातून सर्व पोलीस आयुक्तालयांना पत्र पाठविण्यात आली आहेत. यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर तीन महिन्यांसाठी वाहतुकीचा परवाना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती के. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती सर्व राज्यांना रस्ते सुरक्षा संदर्भात वेळोवेळी निर्देश देते. या समितीने रस्ते अपघातात सर्व प्रकारचे अपघात, एकूण मृत आणि एकूण जखमी यांचे प्रमाण 10 दरवर्षी 10 टक्‍क्‍यांनी घट करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याबाबत राज्य शासनाला आदेश दिले आहेत. या उद्दिष्टाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या समितीतर्फे वेळोवेळी आढावा बैठक घेण्यात येते.

यांच्यावर होणार कारवाई
– मर्यादेपेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणे,
– सिग्नल मोडणे
– क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणे
– मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणे
– दारु पिऊन वाहन चालविणे
– वाहन चालविताना मोबाइलचा वापर करणे आदी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
4 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
8 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)