वाहतूक नियंत्रण कक्षाला अखेर मुहूर्त

पिंपरी – वाकड येथे उभारण्यात आलेल्या पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या वाहतूक नियंत्रण कक्ष व अंमलबजावणी पथकाचे पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्या हस्ते बुधवारी (दि. 24) उद्‌घाटन झाले. कक्षाच्या माध्यमातून शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे सुतोवाच पद्मनाभन यांनी केले.

यावेळी पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, नम्रता पाटील, स्मार्थना पाटील, पोलीस सहायक आयुक्त श्रीधर जाधव व इतर पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या नियंत्रण कक्षाच्या येथून पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीचे व्यवस्थापन केले जाणार असून हिंजवडी, भोसरी, निगडी, पिंपरी, चिंचवड, सांगवी, आळंदी, दिघी, तळेगाव, चाकण या नऊ विभागाचे नियंत्रण येथून केले जाणार आहे. वाहतूक विभागासाठी सध्या 10 वरीष्ठ पोलीस निरीक्षक, 9 पोलीस उनिरीक्षक, 9 सहायक पोलीस निरीक्षक, 210 पोलीस कर्मचारी तसेच 130 महापालिकेचे तर 15 एमआयडीसीचे असे एकूण 145 पोलीस वॉर्डन त्यासाठी नेमण्यात येणार आहे. खास नियंत्रण कक्षासाठी 1 वरीष्ठ पोलीस निरीक्षक, 12 पोलीस कर्मचारी यांच्यामार्फत काम पाहिले जाणार आहे.

या नियंत्रण कक्षाच्या येथून “इन्फोर्समेन्ट सेल’ व नियंत्रण असे दोन मुख्य विभाग चालणार आहेत. यातील “इन्फोर्समेंट सेल’च्या मदतीने ज्या काही वाहतूक नियमाविषयीची गुन्हे आहेत. त्या गुन्ह्यासंदर्भात दंडाची पावती वाहन चालक किंवा वाहन मालकाला एसएमएसद्वारे दिली जाणार आहे. त्याच बरोबर तीच पावती संबंधिताच्या घरी देखील दिली जाणार आहे. या सेलकडून दंडाची रक्कमेची पावती देणे व ती वसूल करण्याचे काम केले जाणार आहे. तर वाहतूक नियंत्रण कक्ष हा शहरातील वाहतूक नियंत्रण करणार आहे.

यावेळी बोलताना पोलीस आयुक्त पद्मनाभन यांनी सूचना केल्या. ते म्हणाले की, मनुष्यबळ कमी आहे. त्यामुळे कामाचे नियोजन गरजेचे आहे. गुन्हेगारीवर वचक बसविण्यासाठी कडक कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे गुन्हेगारीवर वचक बसेल. यासाठी सर्व गृहप्रकल्पांना शनिवारी व रविवारी भेट देवून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी ऐकून घ्या. तसेच गृहप्रकल्पांच्या येथे तक्रार पेटी द्या. त्या तक्रारींची खातरजमा करा व कारवाई करा. जुनी गाडी खरेदी करताना त्याचे पोलीस व्हेरीफिकेशन करण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करा, अशा सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)