वाहतूक, घनकचरा विषयावर जनजागर

पिंपरी – पिंपरी-चिंचवड उद्योग नगरीतील वाढत्या नागरीकरणामुळे वाहतूक व घन कचरा समस्या गंभीर झाली आहे. यासंबंधी प्रबोधन, नियमन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुढाकार घेऊन शासन यंत्रणा व पिंपरी-चिंचवड शहर विकास मंचच्या माध्यमातून संघ कार्यकर्ते यांनी रविवार दि. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9 ते 12 पर्यंत शहराच्या विविध भागांत वाहतूक नियमन करून अनोखे सामाजिक रक्षा बंधन साजरे केले. याबाबत संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार घरातून नोकरीच्या ठिकाणी पोहचेपर्यंत व नोकरीच्या ठिकाणावरून घरी परत येताना सर्वांनाच वाहतूक कोंडी समस्येमुळे त्रास होतो. सुट्टीच्या दिवशी तर प्रवास नकोसा होतो. शहर व उपनगर परिसरात ही समस्या दिवसें-दिवस खूप भयानक होत चालली आहे. हिंजवडीची वाहतूक कोंडी तर जगाच्या पटलावर आहे. वाहतुकीचे नियम न पाळल्याने पुणे पिंपरी-चिंचवड परिसरामध्ये अपघातात वर्षभरात सरासरी 400 लोक मृत्युमुखी पडतात. ह्या सर्व घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वाहतूक व घन कचरा विषयावर समाजाचे जागरण, प्रबोधन व समस्या निर्मूलनाचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी लगेच कार्यवाहीचा भाग म्हणून शासन यंत्रणेच्या मदतीने, पिंपरी-चिंचवड शहर विकास मंचच्या माध्यमातून जिल्ह्यात सुमारे 300 स्वयंसेवकांनी शहरातील आकुर्डी, चिंचवड, देहू, सांगवी, निगडी, पिंपरी, रावेत, वाकड, भोसरी, काळेवाडी यासह विविध भागातील प्रमुख चौकात वाहतूक नियमन करून नागरिकांना त्यासंबंधीची माहिती संदेश पत्रकाचे वाटप, फलकांद्वारे जनजागृती केली. या उपक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाबरोबरच डी. वाय. पाटील अभियांत्रिकी, आकुर्डी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)