वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या पोलिसास दमदाटी

शिक्रापूर- शिक्रापूर (ता.शिरुर) येथे पुणे नगर रस्त्यावर होत असलेली वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या जिल्हा वाहतूक विभागाच्या पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ, दमदाटी केली. याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
शिक्रापूर येथे अभिजीत विष्णु कांबळे या जिल्हा वाहतूक विभागाच्या पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली. शिक्रापूर पोलिसांनी व फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, दिवाळी सुट्टीनंतर पुणे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली असताना जिल्हा वाहतूक विभाग व शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस सायंकाळच्या सुमारास वाहतूक नियंत्रणाचे काम करत होते. नगर बाजूने पुणे बाजुकडे एमएच 14 डिटी 4620 या अल्टो कारवरील चालक तुषार शिंदे हा विरुद्ध बाजूने आला. त्यावेळी वाहतूक नियमनाचे काम करत असलेल्या अभिजीत कांबळे या पोलिस कर्मचाऱ्याने कारचालकास थांबविले. विरुद्ध बाजूने जाऊ नको पुढे वाहतूक कोंडी होईल, अशी विनंती केली. त्यानंतर कारचालक शिंदे हा कांबळे यांना पाठीमागे किती वाहतूक कोंडी झाली आहे, तुम्ही येथे काय करता, असे म्हणत वाहनातून खाली उतरुन पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ, दमदाटी करु लागला. यावेळी तेथे असलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील शिंदे याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु शिंदे काहीही ऐकत नव्हता. पोलिसांच्या कामात अडथळा आणला. याबाबत अभिजीत कांबळे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी तुषार पोपट शिंदे (वय 26, रा. मलठण ता. शिरुर) यांच्यावर गुन्हे दाखल केले. याप्रकरणी तुषार शिंदे याला अटक केली असून पुढील तपास शिक्रापूर पोलीस करीत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)